ऑल इंडिया धनगर समाज लोणावळा शहर अध्यक्षपदी भीमा शिंगाडे..

0
200

खोपोली- दत्तात्रय शेडगे

ऑल इंडिया धनगर महासंघाच्या लोणावळा शहर अध्यक्ष पदी भीमा शिंगाडे यांची निवड करण्यात आली.

ऑल इंडिया धनगर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या आदेशानुसार पुणे जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम कोकरे व कार्याध्यक्ष विजय सरक आणि मावळ तालुका अध्यक्ष बाबुराव शेडगे यांनी त्यांची निवड केली, ऑल इंडिया धनगर महासंघ ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असून पुणे जिल्ह्यात या संघटनेने घौड दौड उभारली असुन संघटना वाढवली आहे, तर या संघटनेमार्फत समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार, यांना वाचा फोडण्यासाठी नेहमी अग्रेसर असून समाजाच्या पाठीशी खंबीर पणे उभे असते.
त्यामुळे ऑल इंडिया धनगर महासंघाच्या लोणावळा शहर अध्यक्ष पदी युवा नेते भीमा शिंगाडे यांची निवड झाली त्यांना ऑल इंडिया धनगर समाज मावळ तालुका अध्यक्ष बाबुराव शेडगे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले, भीमा शिंगाडे यांची निवड होताच सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन करून कौतुक होत आहे.