ऑल इंडिया धनगर समाज वेल्हे तालुक्याच्या वतीने तुकाराम कोकरे यांचा सत्कार..

0
211

खोपोली- दत्तात्रय शेडगे

ऑल इंडिया धनगर समाज पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख पदी युवा नेते तुकाराम यांची निवड झाल्याने त्यांचा ऑल इंडिया धनगर समाज वेल्हे तालुका यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला धनगर समाजाचे एक तरुण तडफदार युवा नेतृत्व तुकाराम कोकरे यांची ऑल इंडिया धनगर समाज पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख पदी निवड झाली.
त्यामुळे ऑल इंडिया धनगर समाज वेल्हे तालुका यांच्या वतीने नुकताच सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता, हा सत्कार समारंभ नुकताच वडगाव पुणे येथे पार पडला यावेळी तुकाराम कोकरे यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या या संघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र भर मोठया प्रमाणात संघटनेची घौडदौड व संघटना बांधणी चालू आहे.
तर या संघाच्या वतीने धनगर समाजावर होणारा अन्याय अत्याचार यावर वाचा फोडून त्यांना न्याय मिळून देण्यासाठी ही संघटना प्रयत्न करीत आहेत.

यावेळी ऑल इंडिया धनगर समाज वेल्हे तालुका अध्यक्ष नथुराम डोईफोडे, मा अध्यक्ष गणपत ढेबे, युवक अध्यक्ष संजय हिरवे, बाळासाहेब ढेबे, पप्पू ढेबे, संतोष ढेबे, शिवाजी कचरे, सुनील मरगळे, दीपक मरगळे, प्रकाश हिरवे ,धनाजी काळे, दत्ता ढेबे,शिवाजी मरगळे,सुरेश ढेबे ,सरपंच संतोष कोकरे, धोंडिबा ढेबे, विलास कोकरे, रमेश मरंगले, प्रकाश कोकरे, राम ढेबे अंकुश खरात, शंकर ढेबे, सुरेश ढेबे, अजिंक्य पोलेकरं, संजय ढेबे ,सुनीता ढेबे आदी उपस्थित होते.