Sunday, April 21, 2024
Homeपुणेमावळओम साई मित्र मंडळ आयोजित साई मंदिराचा 8 वा वर्धापन दिन...

ओम साई मित्र मंडळ आयोजित साई मंदिराचा 8 वा वर्धापन दिन उत्साहाने साजरा….

लोणावळा दि.16 : वाकसई चाळ येथील श्री संत तुकाराम नगरमधील ओम साई मित्र मंडळ आयोजित साई मंदिर 8 वा. वर्धापन दिन साध्या पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला.


कोरोना चे नियम लक्षात घेता साध्या पद्धतीने यंदाचा वर्धापन दिन धार्मिक पद्धतीने पार पाडण्यात आला त्यामध्ये सकाळी 7 ते 10 होम हवन व आरती तसेच सायंकाळी 7 वाजता साईंच्या धुपआरती चे नियोजन करण्यात आले.

तसेच भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यात परिसरातील अनेक नागरिक, महिला व लहान मुलांनी भोजनाचा लाभ घेतला. सध्याच्या कोरोनाचे नियम लक्षात घेऊन व्यवस्थापकांनी ह्या वर्षीचा वर्धापन दिन अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याच प्रमाणे हा 8 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

सायंकाळी 7 वा. साईंची आरती घेण्यात आली त्यावेळी ओम साई मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते तसेच सदस्य, पाहुणेमंडळी व वाकसई ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page