मावळ (प्रतिनिधी):ओवळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ओवळे गावचे युवा उद्योजक दिलीप ज्ञानेश्वर शिंदे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा ओवळे गावातील सामाजिक कार्यकर्ते शिवभक्त-अजित शिंदे मित्र परिवाराच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी गावातील जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून गावच्या विकासासाठी माझी सरपंच म्हणुन बिनविरोध निवड केली व संधी दिलेली आहे.त्यामुळे मी ह्या संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाही.असे मनोगत दिलीप शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.
व शिवभक्त अजित शिंदे मित्र परिवाराचे आभार मानले.यावेळी ओवळे गावचे युवा नेते पै.अक्षयभाऊ भालेराव, पुणे जिल्हा भाजपा सो.मि.उपाध्यक्ष पै.विकासभाऊ घारे ,मावळ भाजपा सो.मि.सदस्य पै.करणभाऊ गोणते तसेच आढले बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य पै. अनिकेत सस्ते आणि इतर मान्यवर उपस्थित होते.