Thursday, November 21, 2024
Homeपुणेलोणावळाऔंढोली येथे आज पुन्हा अजगराचे पिल्लू वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांकडून रेस्क्यू…

औंढोली येथे आज पुन्हा अजगराचे पिल्लू वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांकडून रेस्क्यू…

लोणावळा (प्रतिनिधी):औंढोली येथे आज पुन्हा वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांकडून अजगराचे पिल्लू पकडून जंगलात सोडण्यात आले.
सदस्य मोरेश्वर मांडेकर यांना औंढोली गावातील मंगेश तायडे यांनी फोन करून घोड्याच्या फार्म हाऊस मधील घोड्यांचा चारा असलेल्या रूममध्ये अजगर जातीचे पिल्लु असल्याचे सांगितले. मोरेश्वर यांनी लगेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे व संस्थेचे अध्यक्ष अनिल आंद्रे याना याची माहीती देऊन मोरेश्वर मांडेकर त्यांचे छोटे बंधु निलेश मांडेकर यांना घेऊन गेले,तर एक साधारण 3 फुटाचे अजगर जातीचे पिलू दिसून आले. त्या पिल्लाला पकडून सुखरूप जंगलात सोडण्यात आले.
यावेळी फोन करणारे मंगेश तायडे यांनी याआगोदर 10/15 दिवसांन पुर्वी असेच एक त्यांच्या बंगल्याच्या बाथरूम मध्ये अजगर असल्याचे कळवले होते.आज पुन्हा त्यांनी याबाबत कळविले असता वन्यजीव रक्षक संस्थेचे सदस्य मोरेश्वर मांडेकर,निलेश मांडेकर,मंगेश तायडे व तेथील घोडे फार्म हाऊस मधील माळी यांनी हे लहान अजगराचे पिल्लु रेस्क्यू करून त्याला जंगलात सोडण्यात आले.
- Advertisment -

You cannot copy content of this page