लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष ग्रामस्थांना होतोय नाहक त्रास, रस्त्याच्या डांबरीकरनाला मुहूर्त लागणार कधी -ग्रामस्थांचा सवाल?
खोपोली-दत्तात्रय शेडगे
माणगाव तालुक्यातील दुर्गम भागात आसलेल्या कडापूर ते पळसगाव खुर्द धनवी मार्गे जोर या साडेपाच किमीच्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून , या रस्त्यावर मोठ मोठं खड्डे पडून, रस्त्यावर खडी पसरल्याने याचा नाहक त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे.
गांगवली ग्रामपंचायत हद्दीत पळसगाव खुर्द धनवी, जोर, बापदेव पट्टी, वयली ही गावे येत असून, या गावांना जोडणारा ग्रामीण मार्ग क्रमांक १०७ कडापूर ते पळसगाव खुर्द धनवी मार्गे जोर हा एकमेव रस्ता आहे. मात्र या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्यावरून चालनेही अतिशय धोक्याचे झाले आहे .
या रस्त्यावर मोठं मोठं खड्डे पडले असून, या रस्त्याची खडी निघाल्याने ती पूर्ण रस्त्यावर पसरली असून या रस्त्यावरून ग्रामस्थांना वाहन चालवताना नाहक त्रास होत आहे. या खडी वरून अनेकदा गाड्या घसरून अपघातही झाले असल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र या रस्त्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते संतोष ढवळे-धनवीकर व ग्रामस्थांनी अनेक वेळा खासदार आमदार जिल्हापरिषद यांच्याकडे लेखी निवेदन देऊनही याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते संतोष ढवळे-धनवीकर व ग्रामस्थांनी केला आहे.पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून 2001 साली या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते.
मात्र, आता या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, या रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. या रस्त्यावर दररोज कामगार, शाळेतील मुले, ग्रामस्थ यांना रोज साडेपाच किमी ची पायपीट करावी लागत आहे. या गावाला जाण्यासाठी डांबरी रस्ता नसल्याने येथे एसटी महामंडलांची बस सुध्दा पोहचू शकली नाही.
त्यामुळे या रस्त्याला डांबरीकरनाला मुहूर्त लागणार कधी?असा प्रश्न सदर जनतेने उपस्थित केला आहे.
या ग्रामपंचायत हद्दीत पळसगाव खुर्द धनवी, जोर, बापदेव पट्टी, वयली ही प्रामुख्याने गावे येत असून, येथे सुमारे पाचशे कुटूंब राहत आहेत. मात्र या गावांकडे जाण्यासाठी नीट रस्ताही नसल्याने येथील ग्रामस्थांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष देऊन या रस्त्यांसाठी निधी मंजूर करावा अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते संतोष ढवळे-धनवीकर व ग्रामस्थांनी केली आहे.
प्रतिक्रिया-
आमच्या गावाकडे कडापूर ते जोर हा साडेपाच किमी चा रस्ता असून या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावर खड्डे पडून रस्त्याची खडी निघून ती रस्त्यावर पसरली असल्याने याचा नाहक त्रास रोज ग्रामस्थ वाहन चालक यांना सहन करावा लागत आहे, या रस्त्याला निधी मिळावा यासाठी आम्ही आमदार खासदार, जिल्हा परिषद याकडे लेखी निवेदन देण्यात आले मात्र आमच्या मागणी कडे लोकप्रतिनिधी व प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत.