Wednesday, September 27, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडकराडे खुर्द ग्रामपंचायतच्या वतीने वृक्षारोपण..

कराडे खुर्द ग्रामपंचायतच्या वतीने वृक्षारोपण..

ग्रा. प .सदस्या माधुरी चितळे पुढाकारातुन पार पडला कार्यक्रम..

खोपोली- दत्तात्रय शेडगे

पनवेल तालुक्यातील गृप ग्रामपंचायत कराडे खुर्द यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम पार पाडला , ग्रामपंचायत सदस्या माधुरी प्रशांत चितळे यांच्या पुढाकारातुन हा वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला,
अतिशय प्रतिष्ठेची असलेली कराडे खुर्द ही ग्रामपंचायत असून ग्रामपंचायत वतीने नुकताच ग्रामपंचायत हद्दीतील नवीन वसाहत बौध्दवाडा येथे सुमारे पन्नास ते साठ झाडे लावण्यात आली.

ही झाडे ग्रामपंचायत सदस्या माधुरी प्रशांत चितळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तर हा उपक्रम कराडे खुर्द ग्रामपंचायत सदस्या माधुरी प्रशांत चितळे यांच्या पुढाकाराने पार पडला,यावेळी ग्रामपंचायत सदस्या माधुरी चितळे, शिवसेना शाखाप्रमुख प्रशांत चितळे, ग्रामस्थ विनोद जाधव, प्रमोद जाधव, महेश चितळे आदी सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -