Monday, July 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकरियर निवडताना भविष्यात तो पाल्याला " जीवघेणा " तर ठरणार नाही न...

करियर निवडताना भविष्यात तो पाल्याला ” जीवघेणा ” तर ठरणार नाही न , याचे आत्मचिंतनाची गरज – देवश्री जोशी..

आपल्या ” बुध्दीची क्षमता ” हेच पुढील भविष्य…

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) विद्यार्थी दशकात आपली बुद्धी हि भविष्यात आपण कोण होणार , याचा विचार करण्या एव्हढी सक्षम नसते , म्हणूनच पालकांनी आपल्या पाल्याचे करिअर निवडताना भविष्यात ते आपल्या पाल्यास अभ्यास करताना ” डोईजड होवून जीवघेणा ” तर ठरणार नाही न ? याचे आत्मचिंतन करणे फार गरजेचे असल्याचे , महत्त्वपूर्ण खुलासा मनःस्वास्थ्य क्लिनिक कर्जतच्या प्रसिद्ध समुपदेशक देवश्री जोशी यांनी आजच्या स्पर्धेच्या शिक्षण क्षेत्रात येणाऱ्या पुढील अनुभवा बद्दल कथन केले.

याबाबतीत त्या सांगतात की , करियर निवडावं कसं , काय काळजी घ्यावी मुलांनी आणि पालकांनी सुद्धा ? केतन नुकताच १० वी पास होऊन ११ च्या कॉलेज ला ऍडमिशन घेणार आहे , १० मध्ये ९२% इतके मार्क्स मिळाले तरीपण कॉमर्स ला ऍडमिशन घेऊन कंपनी सेक्रेटरी (CS) होण्याचं स्वप्नं आहे त्याचं. तर आर्वी ला १२ वी नंतर पत्रकार व्हायचं स्वप्नं आहे, त्यामुळे तिने १० नंतर आर्टस् / कला शाखा घेतली.

( ह्या लेखामध्ये कुठे ही आर्टस्, कॉमर्स किंवा विज्ञान /science शाखा चांगल्या वाईट सांगण्याचा कुठला ही हेतू नाही, कृपया गैरसमज करून घेऊ नये.) आपल्या आयुष्यामध्ये करियर निवडणं खूप जास्त महत्वाचं असून आपल्याला त्या पासूनच भविष्यातील जीवनातील ओळख निर्माण होणार असते. कुठलेही शाखा निवडताना स्वतःला खालील काही प्रश्न विचारण्याची यासाठी गरज आहे . १ ) मी हे करियर का निवडते आहे ? २ ) मी ह्या करियर मध्ये आयुष्यभर जॉब / व्यवसाय करू शकणार आहे का ? ३ ) ह्या करियर साठी माझ्या काय क्षमता आहेत आणि माझ्या मध्ये काय कमतरता weaknesses आहेत ? ४ ) ह्या करियर साठी कुठली कौशल्य मला आत्मसात करावी लागणार आहेत ? ५ ) ह्या करियर मधून मला किती आर्थिक पाठबळ मिळू शकणार आहे , माझ्या वैयक्तिक मूल्य जपली जाणार आहेत का ? या प्रश्नांत विद्यार्थ्यांचे सर्व भविष्य दडलेले आहे.

यावर समुपदेशक देवश्री जोशी आपला अनुभव सांगतात की , मला असं वाटतंय १० वी झाल्यांनतर आपण पहिले दोन प्रश्न तरी स्वतःला विचारू शकतो , आजकाल बाहेरच्या शिक्षण क्षेत्रात व पुढे आधुनिक तंत्रज्ञान युगात स्पर्धा खूप वाढल्या आहेत , त्यामुळे संगळ्यांचा कल हा जास्त ” ग्लॅमरस ” क्षेत्र निवडण्याकडे आहे. मग ते आपल्या पाल्याला झेपलं नाही तरी चालेल तरी पण त्याला स्पर्धे मध्ये सोडायचं. स्पर्धा वाईट आहे का ? तर अजिबातच नाही, पण ती आपल्या मुलांच्या बाबतीत ” जीवघेणी ” नाही ना ठरत आहे ? हे बघणं खूप गरजेचं आहे.

आपल्या मुलाचा कल कुठे आहे , त्याला कशाची आवड आहे , त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे , आणि ह्या सगळ्यांनंतर त्या क्षेत्रामध्ये वाव किती आहे . याचे आत्मचिंतन करणे फार गरजेचे आहे . पण आपण बरोबर ह्याच्या उलट करतो आणि फसतो , म्हणजे काय तर आपण आधी त्या क्षेत्राला वाव किती हे बघतो, मग आपली बुद्धी आणि मग आपलं व्यक्तिमत्व . म्हणूनच मुलांनो आणि पालकांनो सगळ्यांना खूप कळकळीची विनंती आहे, कुठलेच क्षेत्र हे कमी किंवा जास्त चांगलं असं नसतं , तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये किती सर्वोत्तम वेळ देवून तेथे पोचता येतंय , हे खूप महत्वाचं आहे . आणि हे जर समजून क्षेत्र निवडलं तर नक्कीच मुलांना येणारे नैराश्य कमी होईल , आणि बेरोजगारचा प्रश्न कमी होईल.

आवडीचं क्षेत्र निवडलं असल्यामुळे त्यात नक्कीच काही ना काही नावीन्य पूर्ण आपला मुलगा / मुलगी करतच राहणार आहे. काही – काही क्षेत्रा मध्ये ” स्टॅबिलिटी ” लवकर मिळते तर काही – काही क्षेत्रात ती नाही मिळत, पण आताच्या धावपळीच्या जगात एवढी स्पर्धा वाढलेली असताना आपल्या मुलाला / मुलासाठी काय चांगलं त्यापेक्षा माझ्या मुलाचा ” कल ” कशात आहे ” आवड ” कशात आहे हे बघणं माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे.

तरुण पिढी मध्ये वाढत जाणारा नैराश्याचा आकडा, किंवा आत्महत्यांचे प्रमाण ह्या सगळ्यासाठी कुठेतरी ह्या गोष्टी पण जबाबदार आहे , ते म्हणजे चुकीचे करियर ! मनाविरुद्ध शिक्षण, मनाविरुद्ध जॉब आणि त्यामधून होणारी मानसिक कुचंबना ह्या सगळ्याला कारणीभूत असते. जर आपल्या मुलाला योग्य निर्णय घेता येत नसेल, किंवा समजत नसेल तर त्यासाठी कल चाचणी (aptitude test) असतात , त्या वेळेत करून घ्या , कारण एकदा निर्णय चुकला तर प्रत्येकालाच माघार घेता येतेच असं नाही , आणि त्यामुळे सगळ्यांचं आयुष्य पणाला लागू शकतं. स्वतःच्या क्षमता ओळखा, आणि क्षमता ओळखून निर्णय घ्या . हा निर्णय घेत असताना कुठेपण मनोपचारतज्ञ म्हणून समुपदेशनाची मदत लागली तर मी नक्कीच आहे . आपली हि जीवनाची समस्या सोडविण्यासाठी आताच मनःस्वास्थ्य क्लिनिक – कर्जत समुपदेशक देवश्री जोशी – ९५२७६७६००८ यावर संपर्क करा.
- Advertisment -

You cannot copy content of this page