![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
” बुजगावण्या कारभाराविरोधात ” वंचित बहुजन आघाडी आक्रमक..
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) वाढत्या नागरीकरणामुळे अपुऱ्या पडत असलेल्या नागरी सुविधा व त्या देण्यास अकार्यक्षम ठरत असलेली कर्जत नगर परिषदेची प्रशासन व्यवस्थेविरोधात दंड थोपटत ” बुजगावण्या अधिकाऱ्यांना ” जाब विचारत आपला कारभार न सुधारल्यास याविरोधात क्रोध आंदोलन छेडण्याचा ईशारा वंचित बहुजन आघाडीचे कर्जत तालुका अध्यक्ष धर्मेंद्र दादा मोरे यांनी कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांना दिला आहे . नुकतीच कर्जत न. प. ची पाच वर्षांची लोकप्रतिनिधींची मुदत संपली असल्याने आता सर्व अधिकार मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या अधिकारात आले आहेत .गेली अनेक महिन्यांपासून त्यांचे पालिकेच्या कारभारावर अंकुश नसल्याने सर्व कारभार ” क्या खबर – बेखबर ” असे चालले असल्याने नागरिकांत संताप खदखदत आहे.
कर्जत शहरात C.C.T.V. नसल्याने होत असलेल्या चोऱ्या व गुन्हेगारीच्या घटना याचे चित्रीकरण दिसत नसल्याने गुन्हेगारी फोफावली आहे , म्हणून त्वरित सी सी टी व्ही कॅमेरे बसविणे , योग्य ठिकाणी स्पीड ब्रेकर नसल्याने बेफाम चालवणारे तरुण वाहन धारक यांना लगाम कोणी घालू शकत नाही .त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे , तर जोशात वाहन चालवीत असल्याने ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग चालताना घाबरत आहेत , म्हणून योग्य ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविणे , कर्जतकरांना अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याने आरोग्याची सुरक्षितता राहिली नाही . नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे , म्हणून शुद्ध पाणी देणे , पाणी सोडणेची अनियमित वेळ असल्याने दुपारी पाणी सोडल्यास कामकाजासाठी बाहेर गेलेल्या कुटुंबाला व महिला वर्गाला पाण्या अभावी त्रासास सामोरे जावे लागते , म्हणूनच वेळेवर पाणी सोडण्यात यावे , सध्या गेली अनेक दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने या दमट – कोंदट वातावरणात डास , गटारावरील जंतू यांत वाढ होवून नागरिकांचे आरोग्य बाधित झाले असून अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे . म्हणूनच जंतू नाशक फवारणी , धूर फवारणी करणेबाबतच्या संतप्त मागण्या आज वंचित बहुजन आघाडी ता. शाखा कर्जतच्या वतीने ता. अध्यक्ष धर्मेंद्र दादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कर्जतकर नागरिकांना मूलभूत गरजा व आरोग्य सुरक्षा देवू शकत नसल्याने त्वरित आपला ” ढोबळ कारभार ” न सुधारल्यास व आमच्या निवेदनाची दखल न घेतल्यास पक्षा तर्फे ” तीव्र स्वरुपाचे आंदोलन ” छेडण्यात येईल , असा इशारा कर्जत ता. अध्यक्ष धर्मेंद्र दादा मोरे यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे . सदर निवेदन देताना सम्यक विदयार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ते ऍड. कैलास मोरे , वंचित जिल्हा सचिव अनिल गवळे , जिल्हा संघटक सुनील आप्पा गायकवाड , वंचित तालुका अध्यक्ष धर्मेंद्र दादा मोरे , महासचिव प्रदिप ढोले , शहर अध्यक्ष लोकेश यादव , सुनिल वाघमारे , प्रदिप गायकवाड , आकाश शिंदे , आय. टी सेल प्रमुख प्रणेश यादव , शहर महासचिव शैलेश खोब्रागडे , कमलाकर जाधव , अमित गायकवाड आदी पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.