Monday, July 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतचा " भावी आमदार " फक्त मीच नसून सर्व निष्ठावंत शिवसैनिक असणार...

कर्जतचा ” भावी आमदार ” फक्त मीच नसून सर्व निष्ठावंत शिवसैनिक असणार -उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) दोन वर्षांपूर्वी अखंडित असलेली शिवसेना फुटल्याने अनेकांनी पक्ष सोडून गेल्यावर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची ” धुरा ” समर्थपणे सांभाळून येथील शिवसैनिकांना एकाच ” शिव बंधनात ” बांधून सेनापती म्हणून उपजिल्हा प्रमुख पद यशस्वीरित्या सांभाळत पक्षाला नवसंजीवनी देवून लोकसभेच्या निवडणुकीत सर्व पदाधिकारी व निष्ठावंत शिवसैनिकांच्या जोरावर १८ हजारांचे मताधिक्य घेत ” हम भी कूछ कम नहीं ” हे दाखविणारे उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांनी कर्जत खालापूर विधानसभा उमेदवारीवर ” दावा ” ठोकला असून पुढील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे व इंडिया आघाडीचा उमेदवार ” मीच ” असणार , असे पत्रकार परिषदेत घोषित केले.

गेली १५ वर्षे कर्जत नगर परिषदेचे नगरसेवक , सभापती पद , गटनेते अशी धुरा सांभाळणारे शिवसेना पक्षाचे एकनिष्ठ सेनापती म्हणून या मतदार संघात काम करून नितीन दादा सावंत यांनी उपजिल्हा प्रमुख पदापर्यंत मजल मारली आहे . गेली दोन वर्षांत कर्जत खालापूर मतदार संघात ” लोकाभिमुख ” कार्य करून कुठेही ” गाजावाजा ” न करता त्यांनी जनमानसात आपले नाव उंचावले असून ग्रामीण भागात गाव – वस्त्या – वाड्या – पाड्यात जावून कट्टर शिवसैनिकांच्या मनाचा वेध नुकताच ” शिव संवाद बैठक दौऱ्याच्या ” निमित्ताने घेतला आहे . लोकसभेच्या निवडणुकीत येथील मतदार व हा मतदार संघ शिवसेना तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठाम असल्याचे सिद्ध केले आहे . पुढील काळात १८ हजाराचे मताधिक्य अजून कसे वाढेल , याची सुरुवात त्यांनी शिव संवाद बैठक दौऱ्याच्या निमित्ताने केली आहे , त्यामुळे तुम्ही करत असलेले कार्य आमच्यासाठी खूप मोठे असून पुढील विधानसभेचे इंडिया आघाडीचे उमेदवार तुम्हीच असाल , असा विश्वास देखील येथील पदाधिकारी व शिवसैनिकांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या समोर ग्वाही देवून आम्ही उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांच्या पाठीशी ठाम असल्याचे सांगितले आहे.

कर्जत खालापूर मतदार संघाचा पुढील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष व इंडिया आघाडीचा उमेदवार मीच असून माझा निष्ठावंत शिवसैनिकच या मतदार संघाचा पुढील ” भावी आमदार असेल ” , अशी ग्वाही देत , पुढील उमेदवार ” आयात ” केलेला असेल , या ” जर – तर ” च्या उठलेल्या ” वादळी चर्चेवर ” शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत यांनी ” मीच उमेदवार ” असा दावा ठोकत पत्रकार परिषद घेवून पूर्णविराम दिला.

या पत्रकार परिषदेत उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांच्या समवेत कर्जत ता. प्रमुख उत्तम दादा कोळंबे , खालापूर ता. प्रमुख एकनाथ पिंगळे , संघटक बाबू घारे , ऍड. संपत हाडप तसेच अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page