कर्जतच्या नगराध्यक्षा सौ.सुवर्णा केतन जोशी राज्यस्तरीय ” युवा वॉरीअर्स ” पुरस्काराने सन्मानित..

0
73

भिसेगाव-कर्जत/सुभाष सोनावणे-

कोरोना महामारीच्या काळात कर्जतकर नागरिकांची सुरक्षा अबाधित रहाण्यासाठी अविरत सेवा प्रदान करून कवच कुंडले रुपी साधनांचा वापर करत सुरक्षेची भिंत घालून ही महामारी रोखण्याचे अमूल्य कार्य कर्जत नगर परिषदेच्या डॅशिंग व कर्तृत्ववान नगराध्यक्षा सौ.सुवर्णा केतन जोशी यांनी केले.

एक स्त्री असूनही त्यांच्या कार्याने स्त्री शक्तीचं नाविन्यपूर्ण रूप सर्वांना पहाण्यास मिळाले . त्यांच्या या डॅशिंग कर्तृत्ववान कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय ” युवा वॉरीअर्स ” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


शनिवार दिनांक २० फेब्रुवारी २०२१ रोजी हॉटेल हयात इंटरनॅशनल , पुणे येथे सकाळ युवा वॉरीअर्स हा अत्यंत देखणा दिमाखदार सन्मान-सोहळा पार पडला,यामध्ये महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, सहकार, कृषी, शिक्षण या विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील ३५ जिल्ह्यातील एक याप्रमाणे ३५ कर्तृत्ववान शिलेदार निवडण्यात आले.

सकाळ माध्यम समूहाच्या यिन या युवा व्यासपीठाकडून सत्कार-सन्मान करण्यात आला. यामध्ये 33 पुरुष शिलेदार तर दोनच स्त्री शिलेदार निवडले गेले. मुंबई – पुणे शहराच्या मध्य असलेले कर्जत शहरासाठी अभिमानाची व कर्जतच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने नोंद करण्याची गोष्ट म्हणजे कर्जतच्या प्रथम नागरिक आणि तरुण – तडफदार – डॅशिंग नगराध्यक्षा सौ.सुवर्णा केतन जोशी यांना हा राज्य पातळीवरचा ” युवा वॉरीअर्स ” हा पुरस्कार अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

कोरोना महामारीच्या काळात ” न भूतो , न भविष्यती ” अशी कामगिरी केल्याबाबत हा पुरस्कार राज्याच्या युवा पर्यटन राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री आदरणीय आदितीताई तटकरे आणि युवा सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री.विश्वजित कदम यांचे हस्ते या पुरस्करांचे वितरण करण्यात आले.


कर्जत नगरीच्या डॅशिंग कर्तृत्ववान नगराध्यक्षा सौ.सुवर्णा केतन जोशी यांनी हा पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या समवेत त्यांचे आधारस्तंभ , त्यांच्या प्रत्येक कार्यात साथ व धीर देणारे त्यांचे पती उद्योजक केतन जोशी हे होतेे.

त्यांच्या बरोबरच कर्जत नगरीचे नाव व सन्मान झाल्याने व कर्जतच्या इतिहासात महिला नगराध्यक्षांचा सन्मान प्रथमच होत असल्याने ही नोंद सुवर्ण अक्षराने लिहली गेली असून कर्जत तालुक्यात व शहरात आनंदाचे वातावरण आहे . तर यावेळी अनेकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला .