Tuesday, May 30, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतच्या नाक्यावर गटाराचे झाकण खराब झाल्याने अपघाताची शक्यता !

कर्जतच्या नाक्यावर गटाराचे झाकण खराब झाल्याने अपघाताची शक्यता !

झाकण त्वरित बदली करण्याचे व्यापारी व नागरिकांची मागणी…

भिसेगाव- कर्जत (सुभाष सोनावणे) कर्जत नगर परिषद हद्दीत रेल्वे स्थानकाच्या बाहेर पूर्व दिशेला बाजारपेठेला सुरुवात होते . या बाजारपेठेत रेल्वे प्रवासी , ग्राहकांची , वाहनांची , त्याचप्रमाणे चालत पाल्यांना शाळेत सोडणा-या महिलावर्ग , यांची नेहमीच वर्दळ असते . या मुख्य बाजारपेठेतच प्रथम दर्शनी भागात शिंदे हॉटेल व संतोष वाईन्स समोर असणाऱ्या गटारावरील झाकण गेली आठ दिवस खराब झाले आहे.
यामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने कर्जत नगर परिषदेने त्वरित हा अपघातग्रस्त झाकण बदली करावे , अशी मागणी जोर धरू लागली आहे.याबाबतीत सविस्तर वृत्त असे की , कर्जत रेल्वे स्थानकाच्या बाहेरच पालिका हद्दीत असणाऱ्या गटारावरील झाकण खराब झाले आहे.
या झाकणाच्या जाळ्या फाकल्या असल्याने या निर्माण झालेल्या पोकळीत दोनचाकी , हातगाडीचे चाक , तर नागरिकांचे पाय अडकून पडल्याचे घटना व लहान मुलांचे पाय त्या झाकणाच्या पोकळीत अडकल्यास दुखापत व प्रसंगी पाय खुब्यातून मोडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने , त्वरित कर्जत नगर परिषदेच्या प्रशासनाने व लोकप्रतिनिधी यांनी या अपघात ग्रस्त झाकणाचा बंदोबस्त करून झाकण बदली करण्याची मागणी येथील व्यापारी , नागरिक व रेल्वे प्रवासी यांनी केली आहे.

You cannot copy content of this page