Wednesday, May 29, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतमधील एक विश्वसनीय , सर्वांच्या पसंतीचे " स्वर्ण भैरव ज्वेलर्स " नव्या...

कर्जतमधील एक विश्वसनीय , सर्वांच्या पसंतीचे ” स्वर्ण भैरव ज्वेलर्स ” नव्या दिमाखात !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) गेली २० वर्षे कर्जत मध्ये महावीर पेठेत सर्वांच्या विश्वासातील , शंभर नंबरी अस्सल सोन देणारे ठिकाण म्हणजे भैरव ज्वेलर्स , यावेळी ” अक्षय तृतीया ” च्या मुहूर्तावर शुक्रवार १० मे २०२४ रोजी एका नव्या स्वरूपात , नव्या दिमाखात सर्वांच्या पसंतीला उतरण्यासाठी सरसावले असून आकर्षक नक्षीकाम केलेल्या , मन प्रसन्न करणारे , आगळ्या वेगळ्या विविध कलागुणांनी साकारलेले सोने ग्राहकांच्या पसंतीला उतरणार आहे . यावेळी स्वर्ण भैरव ज्वेलर्स प्रा. लि. म्हणून सुनील सोनी यांनी साकारलेले हे ज्वेलर्स दुकान खरोखरच बघण्यासारखे झाले आहे.

कर्जतमध्ये भैरव ज्वेलर्स गेली २० वर्षे सोने खरेदी करण्याचे ग्राहकांच्या पसंतीचे ज्वेलर्स दुकान आहे . या दुकानाचे सर्वेसर्वा सुनील शेठ सोनी यांचे सर्व क्षेत्रात जिव्हाळ्याचे हित संबंध असल्याने ग्राहकांना दर्जेदार अस्सल सोन देण्याचे विश्वसनीय पेढी असल्याने त्यांच्या या ज्वेलर्स दुकानात नेहमीच सोने खरेदी करण्यास ग्राहकांची पसंती असते . ग्राहकांना नवनवीन क्वालिटी , आकर्षक नक्षीकाम केलेले , साजेसे अस्सल सोन मिळावे म्हणून मुंबई सारख्या तारांकित ज्वेलर्स दुकान असल्या सारखे त्यांनी इंटिरियर करून नव्या रुपात – नव्या दिमाखात ग्राहकांच्या सेवेसाठी ” स्वर्ण भैरव ज्वेलर्स ” प्रा . लि. असे नामकरण करून त्यांचे विधिवत पूजा करून अक्षय तृतीया या मुहूर्तावर उद्घाटन केले . ग्राहकांना सोन खरेदी करण्यास मुंबईला , पनवेल येथे जावे लागते , त्यांना होणारा त्रास ओळखून तशाच वेगवेगळ्या व्हरायटी , अस्सल क्याटीगिरी , सांभर नंबरी सोने देण्याचा प्रयत्न ” स्वर्ण भैरव ज्वेलर्स ” करणार आहे . यावेळी मराठी सिरीयल फेम रुपाली भोसले – आई कुठे काय करते या सेलिब्रिटी ग्राहकांना भेटण्यास उपस्थित होत्या.

यावेळी या ” स्वर्ण भैरव ज्वेलर्स ” चे मालक सुनील सोनी यांनी १० मे ते १० ऑगस्ट २०२४ पर्यंत आमच्या ज्वेलर्स मध्ये सोने घडविल्यास ग्राहकांसाठी ० % पासून मजूरी असेल , अशी खास ऑफर आहे . यामुळे ग्राहकांचा ७ ते ८ हजाराचा फायदा होणार आहे . कर्जत मध्ये महावीर पेठ , कर्जत रेल्वे स्थानकाजवळ , कर्जत, जि. रायगड महाराष्ट्र – ४१०२०१ असा पत्ता असून आपल्या सेवेसाठी या 9762258867/ 9657970848/ 9511750533 नंबरवर संपर्क करावा , असे ग्राहकांना ” स्वर्ण भैरव ज्वेलर्स प्रा. लि. चे सर्वेसर्वा सुनील शेठ सोनी ” यांनी सूचित केले आहे . या स्वर्ण भैरव ज्वेलर्स प्रा. लि. च्या उद्घाटन व विधिवत पूजेच्या प्रसंगी सुनील शेठ सोनी यांचा कुटुंब परिवार , मित्र परिवार , व आजपर्यंतचे विश्वसनीय ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी ग्राहकांनी मोठ्या उत्साहात सोने खरेदी करून त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या .
- Advertisment -

You cannot copy content of this page