Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतमधे होणार जेष्ठांचा “ समाजरत्न ” पुरस्कार देवुन सन्मान !

कर्जतमधे होणार जेष्ठांचा “ समाजरत्न ” पुरस्कार देवुन सन्मान !

रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडीया ( आठवले ) पक्षाच्या वतीने होणार भव्यदिव्य सोहळा…

कर्जत – भिसेगाव( सुभाष सोनावणे ) रिपब्लीकन पार्टी ॲाफ इंडीया ( आठवले ) कर्जत तालुक्याच्या वतीने कर्जत तालुक्यांतील धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जेष्ठांना “ समाजरत्न ” पुरस्कार सन्मान देवून गौरविण्यात येणार आहे. ३० ॲाक्टोबर २०२२ रोजी सांयकाळी ६.३० वाजता कर्जत तालुक्यांतील तांबस येथील “ जॅाय फार्म ” येथील प्रांगणात या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आरपीआयचे जिल्हा संपर्कप्रमुख धर्मानंद गायकवाड यांनी दिली आहे.

दरम्यान या “ समाजरत्न ” सन्मान सोहळ्यास रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडियाचे कोकण प्रदेश अध्यक्ष भाई जगदीश गायकवाड, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख धर्मानंद गायकवाड, रायगडचे उत्तर जिल्हाअध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड, युवक अध्यक्ष प्रमोद महाडीक, कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड, विद्याथी परिषद रायगड जिल्हाध्यक्ष ॲड. उत्तम गायकवाड हे उपस्थित राहुन यांच्या हस्ते हा “ समाजरत्न ” पुरस्कार सोहळा देवुन सन्मानित मान्यवरांना गौरविण्यात येणार आहे.सदर “ समाजरत्न ” सन्मान सोहळा यशस्वी पार पडण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडीयाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख धर्मानंद गायकवाड, कर्जत तालुकाअध्यक्ष हिरामण भाई गायकवाड, महिला तालुका अध्यक्षा सौ.अलका सोनावणे, कार्याध्यक्ष दिनेश गायकवाड, युवक अध्यक्ष अमर जाधव, जिल्हा उपाध्यक्ष नरेश गायकवाड, तानाजी गायकवाड, तालुका उपाध्यक्ष बबलु ढाले, प्रकाश गायकवाड, दिपक गायकवाड, अंकुश सुरवसे, भालचंद्र गायकवाड, जगदीश शिंदे, नेरळ शहरअध्यक्ष दिनेश आढाव, सिंचन राजु आढाव, सचिव अनंता खंडागले, सहसचिव जिवक गायकवाड, विकास गायकवाड, उमरोली जिल्हा परीषद वॅार्ड अध्यक्ष संदिप गायकवाड, उपाध्यक्ष अमर गायकवाड, कडाव जिल्हा परीषद वॅार्ड अध्यक्ष अमर जाधव, कर्जत महीला शहरअध्यक्ष वैशाली महेश भोसले, नेरळ शहर अध्यक्ष सुरेखा कांबळे, संघटक वर्षा चिकणे, कविता शिंदे, तालुका सचिव उज्वला सोनावणे यासंह रिपाइंचे अनेक पदाधिकारी मेहनत घेत आहेत.

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांतील असामान्य व्यक्तीमत्व, सामाजिक कार्याची जाण, तरुण वर्गाला योग्य संदेश देणारे, अनुभवाचा खजिना असणारे, एकात्मतेची भावना जाग्रुत करणारे, सामाजिक ऐक्य साधणाऱ्या जेष्ठांना रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडीया कर्जत तालुक्याचा वतीने “ समाजरत्न ” पुरस्कार देवुन प्रथमच गौरविण्यात येत आहे, त्यामुळे जेष्ठांचा सन्मान करुन रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडिया सामाजिक हित जोपासत असल्याचे दिसुन येत आहे. या कार्यक्रमाने पुन्हा जेष्ठांच्या आठवणींना उजाला मिळणार असुन “ न भुतो ना भविष्यती ” असा हा सोहळा पार पडणार असल्याने या सन्मान सोहळ्याकडे समस्त रायगड जिल्ह्यांचे लक्ष लागुन राहीले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page