Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतमध्ये अक्षय तृतीया महोत्सव धापया मंदिरात घुमला भजन संगीताचा नाद !

कर्जतमध्ये अक्षय तृतीया महोत्सव धापया मंदिरात घुमला भजन संगीताचा नाद !

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जतचे ग्रामदैवत श्री धापया  महाराज देवस्थान उत्सव अक्षय तृतीयाच्या या शुभ दिनी दरवर्षी साजरा होत असतो . यानिमित्ताने अनेक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे होत असतात .याठिकाणी यात्रेचे स्वरूप असताना भाविक देखील पहाटे पासूनच धापया महाराजांचे दर्शन घेण्यास येतात . तर भाविकांना भक्तिमय वातावरणात संध्याकाळी भजनी संगीताचा नाद ऐकण्यास मिळाला.अतिशय सुमधुर आवाजात चक्री भजनात भजन संगीताचे गुरू माऊली प्रसाद बुवा पाटील , सुनील बुवा देशमुख , व अनेकांनी भजनात भाग घेऊन सर्वांनाच मंत्रमुग्ध केले.
श्री धापया महाराज देवस्थानचा उत्सव दरवर्षी मोठया उत्साहात साजरा केला जातो . शनिवार दि. २२ एप्रिल रोजी पहाटे पाच वाजताच अक्षय्य तृतीया उत्सवा निमित्त सनईवादन झाले , तर ६ वाजता लघुरुद्र करून श्री धापया महाराज देवस्थानची पूजा अर्चा करण्यात आली , तर दिवसभर देवस्थान परिसरात दर्शन घेण्यास भाविकांची रांग होती , कुणाचे नवस फेडण्याची रिघ तसेच येथे जत्रेचे स्वरूप होते . मिठाई , खेळणी दुकानवाले दिवसभर बसले असताना सायंकाळी ५ वाजता ” श्रीं ” ची पालखी व मिरवणूक संपूर्ण कर्जतभर काढण्यात आली.

सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध बुवांचे चक्री भजन झाले , यांत ” आज उत्तम सुदिन झाले दर्शन संतांचे ” , विठ्ठल विठ्ठल गजरी गजरी , दुंमदुंमली पंढरी , माझे माहेर पंढरी , आहे भीमरेच्या तिरी , शालू रंगाने भिजला , काय करावे , हरिला , अशी मंत्रमुग्ध भजन गाऊन परिसर भक्तिमय केले . धापया देवस्थान कमिटीच्या वतीने अध्यक्ष गणेश संजय शिंदे , उपाध्यक्ष – प्रकाश दामोदर आणेकर , खजिनदार – महेंद्र बबन चंदन ( पाटील ) , सहखजिनदार – गौरव चंद्रकांत भानुसघरे , चिटणीस – मनोज चंद्रकांत वरसोलिकर , सहचिटणीस – सचिन एकनाथ दगडे ,यांनी सर्वांचे फुलगुच्छ व नारळ देऊन सन्मानित केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page