भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भावी खासदार तथा मावळ लोकसभा मतदार संघाच्या पदाधिकारी सौ. माधवीताई नरेश जोशी यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होवून आज शेळके हॉल कर्जत येथे झालेल्या कार्यक्रमात कर्जत – खालापूर मतदार संघातील अनेकांनी पक्ष प्रवेश करून या महाराष्ट्राला पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार साहेब यांनी ” मी महाराष्ट्रवादी ” , लढा अस्मितेचा – आपल्या स्वाभिमानाचा म्हणून दिलेल्या हाकेला अनेकांनी प्रतिसाद दिला . जवळ जवळ २०० च्या वर नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांच्या पक्षात येवून साथ दिली.
यावेळी व्यासपीठावर मावळ लोकसभा मतदार संघाच्या पदाधिकारी तथा भावी खासदार म्हणून नेतृत्व करू पहाणाऱ्या सौ. माधवी ताई जोशी , महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य नरेश जोशी , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा राजिपचे मा. अध्यक्ष सुरेश दादा टोकरे , जिल्ह्याचे नेते तानाजी चव्हाण , पनवेल अध्यक्ष डोईफोडे , मोकल दादा , कर्जत तालुका अध्यक्ष शंकर भुसारी , त्याचप्रमाणे अनेक मान्यवर , महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना माधवी ताई जोशी यांनी तुम्ही आज जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला आहे हा तुमचा विश्वास मी व आमचे सर्व पदाधिकारी सार्थ ठरवतील , आजचा पक्ष प्रवेश पक्षासाठी खूपच मोठी ताकद वाढविणारा आहे , पवार साहेबांचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी आहे , साहेबांनी जो विश्वास माझ्यावर ठेवला आहे ते मी सार्थ ठरवेन , या पक्षात जे राहिले आहेत , तेच खरे कार्यकर्ते आहेत , असे भावनिक मत त्यांनी व्यक्त केले.
तर जिल्हाध्यक्ष तथा राजिप मा. अध्यक्ष सुरेश दादा टोकरे यांनी पक्ष दुभंगल्यानंत्तर ही पहिलीच सभा , व पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम धुमधडाक्यात होत आहे . मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना राजिपा चा अध्यक्ष झालो , तसे माधवी ताई जोशी या खासदार झाल्या तर संसद भवनात जाऊन बसतील , हे माझ्यासाठी माझ्या अध्यक्ष पदाच्या कार्यकिर्दित आनंदाची बात असेल , यावर प्रकाश टाकला.
जिल्हा नेते तानाजी चव्हाण यांनी कर्जत – खालापूर तालुक्यातील अनेकांचा पक्षप्रवेश आज होत असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून सन १९९९ पासून गेली २४ वर्षे आम्ही काम करत आहे , असे सांगताना त्यावेळी फक्त ५ जणांनी कर्जत तालुक्यात पक्षाची स्थापना केली व नंतर पक्षाचा विस्तार झाला , या पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार साहेबांना आज हा पक्ष कुणाचा , घड्याळ चिन्ह कुणाचं यासाठी निवडणूक आयोगाकडे जावे लागते , ही दुर्दैवाची बाब आहे . असे भावनिक मत प्रगट करत फूट पडल्यानंतर या पक्षात कोण रहातय , कोण जातय हे समजणं मुश्किल होते , पण लाखो कार्यकर्ते अजूनही पवार साहेबांच्या बरोबर आहेत , शेतकरी असो , कामगार असो यांच्यासाठी नेहमीच मदतीला धावून पवार साहेब अग्रेसर राहून मदत केली आहे , यावर प्रकाश टाकला . शेतकरी बांधवांची हजारो करोडो रुपयांची कर्जे माफ केली , विरोधकांवर तोफ डागताना ते म्हणाले की , कर्जत – खालापूर मतदार संघाचे माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांनी ज्यांना मोठे केले , तेच आज त्यांच्यावर उरफटले , याच दुःख होत असून , सर्वानाच वाटते मी आमदार व्हावे , म्हणून अशी पक्षाची व मोठ करणाऱ्यांची साथ कुणी सोडून वागू नये , असा मोलाचा सल्ला देखील जे पक्ष सोडून गेले त्या विरोधकांना दिला . भावी खासदार माधवी ताईं जोशी यांची समाजपयोगी कामे व उपक्रम सुरू आहेत , याची त्यांनी प्रशंसा केली व त्यांना भावी खासदार नक्कीच व्हाल , अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी पनवेल ता. अध्यक्ष डोईफोडे यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले . माधवी ताईंचे कार्य , गोर गरीबांना करत असलेली मदत , रुग्णांना होणाऱ्या पैशारुपी मदतीमुळे त्यांचे वाचत असलेला जीव , नागरिकांच्या समस्या , जीवनावश्यक प्रश्न किती तात्काळ सोडवतात , याचे कथन केले . म्हणूनच सत्ता नसताना ही माधवी ताईंच्या नेतृत्वाखाली पक्षात पक्ष प्रवेश होत आहे , निवडणुकीत ताईंना मतदान करून खासदार म्हणून निवडून द्या , असे आवाहन त्यांनी यावेळी केले . यावेळी शेळके हॉल खचाखच भरला होता.