Saturday, December 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतमध्ये आर पी आय - १९५६ पक्षाचा कार्यकर्ता मेळावा " न भूतो...

कर्जतमध्ये आर पी आय – १९५६ पक्षाचा कार्यकर्ता मेळावा ” न भूतो न भविष्यती ” गर्दीने संपन्न…

समाजाला ” सामाजिक – आर्थिक – राजकीय न्याय ” देण्यासाठीच मी आलो आहे – डॉ. राजरत्न आंबेडकर..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) भारतीय बौद्ध महासभा हि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली धार्मिक संस्था आर एस एस व विश्व हिंदू परिषद गिळंकृत करण्याचा प्रयत्न करत होती , मात्र सन २०१८ ते २०२४ दरम्यान बौद्ध परिषदेस उपस्थित राहून त्यांचा हा विचार आम्ही हाणून पाडला . तीच अवस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची झाली असून बहुजन समाजाला ” सामाजिक – आर्थिक – राजकीय न्याय ” देण्यासाठीच मी आलो आहे , असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – १९५६ या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न अशोकराव आंबेडकर यांनी व्यक्त केले . रविवार दिनांक १५ सप्टेंबर २०२४ रोजी शेळके हॉल किरवली – कर्जत येथे कार्यकर्ता भव्य मेळावा , आयोजित केला होता . यावेळी हे सभागृह खचाखच भरले होते , तर खुर्च्या कमी पडल्याने कार्यकर्ते खाली बसून डॉ. राजरत्न आंबेडकर यांचे विचार ऐकत होते , शिवाय बाहेर देखील तुफानी ” अभूतपूर्व गर्दी ” पहाण्यास मिळाली.

” राजरत्न आया है , नई रोशनी लाया है …..डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो , डॉ. राजरत्न आंबेडकर साहेब आप आगे बढो , हम तुम्हारे , साथ है….अशा घोषणांनी परिसर , तसेच हॉल दणाणून गेला होता , तर डॉ. राजरत्न आंबेडकर यांची घोड्यावरून ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले . यावेळी महापुरुषांच्या प्रतिमेस त्यांनी पुष्पहार अर्पण केले .गट नाही आता फक्त पर्याय….आर पी आय – १९५६ , असे घोष वाक्य घेवून त्यांनी तमाम उपस्थित बांधव व माय भगिनींना संबोधले की , जागतिक बौद्ध परिषद येथे सन २०१५ साली मी गेलो असता तेथे बौद्धांचे प्रतिनिधित्व तिवारी – त्रिपाठी – कुलकर्णी करत होते , मात्र या सर्वांना बाहेर काढून आज परिषदेस अध्यक्ष सभासद म्हणून फक्त मला आमंत्रण देण्यात आले आहे .
अशीच घुसखोरी आर पी आय पक्षामध्ये झाली असून अनेक वर्षे समाजाला विकण्याचे काम केले जात आहे , मात्र आज जनता म्हणते आम्हाला विकल जायचं नाही , वरचा नेता विकाऊ झाला आहे , तो जनतेला विकत आहे , यावर त्यांनी प्रकाश टाकला . किती खासदार तुमच्या विचारांचे आहेत , राज्यात २९ आमदार तर १४३ खासदार एस सी जागेवर निवडून येतात , मात्र समाजावर कितीही अन्याय झाला तरी कोण बोलत नाहीत , असा आरोप त्यांनी याप्रसंगी केला . मनिषा वाल्मिकी या भगिनीवर आखळूज येथे बलात्कार झाला , तेथे आमदार व खासदार ही एस सी समाजाचा तरी ते न्याय देवू शकले नाहीत , अश्या दलालांचा भरणा झाला आहे , त्यांना बाहेर हाकल्यासाठी मी आलो आहे , असे त्यांनी ठणकावून सांगितले . निवडणुका संपल्या आत्ता मात्र कोण म्हणतं नाही , संविधान धोक्यात आहे ? असा त्यांनी संतप्त सवाल उपस्थित केला.

एकमेकांच्या जाती विरोधात बोलल्यावर कोण तुम्हाला मते देणार का , असा गेम भाजप व काँग्रेसचा सुरू आहे , हे सांगताना शिडी चा गेम सुरू असून कधी हा पक्ष वर तर तो खाली , मात्र आपण कुठे आहोत , याचा शोध घ्या , आपली मते घ्यायची पण आपली फक्त बघ्याची भूमिका आहे , लोकसभेच्या निवडणुकीत ४० लाख मते आम्ही दिली , ४ लाखात एक खासदार होतो , आज त्याच्यात आपला एकही खासदार नाही , अशी शोकांतिका त्यांनी बोलून दाखवली . पवई येथे हिरा नंदानी बिल्डरने भर पावसाळ्यात प्रशासनाला हाताशी धरून ७०० झोपड्या तोडल्या , कोणत्या आधारावर तोडल्या , मात्र विधानसभेत प्रश्न विचारण्यासाठी १५ लाख हवे आहेत , असे एस सी कोट्यातून निवडून आलेले आमदार म्हणतात , असा खेदजनक प्रकार त्यांनी सांगितला . आमदार दोन तालुक्याचा , खासदार जिल्ह्याचा असतो , मात्र मी ते होण्यास आलो नाही , मी १२८ देशांचे नेतृत्व करण्यास आलो आहे , असे डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी त्यांची भूमिका सांगितली , यावेळी जयघोष व टाळ्यांचा कडकडाट झाला . माझा बेनिफिट मायावती , प्रकाश आंबेडकर यांनी घ्यावा , देश बचाव , संविधान बचाव हे नेतृत्व मी करत आहे , देशात नरेंद्र , राज्यात देवेंद्र , मग आम्ही म्हटले देशात मायावतींजी , तर राज्यात प्रकाशजी , मात्र ते घडल नाही , यावर त्यांनी प्रकाश टाकला . संविधान धोक्यात आहे , असा प्रचार करून राहुल गांधी त्याचा फायदा घेत आहे , नितीन राऊत माझ्या भाषणाच्या क्लिप व्हायरल करून मते घेत होते , असा आरोप देखील त्यांनी केला . म्हणूनच माझा एक एक शब्द न शब्द माझ्या माणसांसाठी उपयोगी झाला पाहिजे , माझ्या नावात जे आहे ते राष्ट्रपती पदा पेक्षा मोठ आहे , असे गौरोद्गार त्यांनी काढले . चार संस्था म्हणजे बाबासाहेबांची लेकरे आहेत , जे त्यांच्या विचारांवर चालतात तीच खरी लेकरे आहेत , मी पणतू नात्याने जरी असलो तरी , विचारांनी बाबासाहेबांचा ” राजरत्नच ” आहे , माझी चळवळ महायुती , आघाडीच्या पैशावर चालत नाही , गोर गरीब आंबेडकरी अनुयायी यांनी प्रेम , आदराने दिलेल्या १०० रू. चालते .असे ठणकावून त्यांनी सांगितले.

आरक्षण कसे हटवायचे , आजही देशात विषमता आहे , ज्यावेळी जाती जातीतील विषमता जाईल त्यावेळी आरक्षण बंद केले जाईल , असे राहुल गांधी म्हटले , मात्र या वाक्याचा विपर्यास केला गेला , जे आंदोलन करायला मी नकार दिला , ते आंदोलन माझे काका करत आहेत , असे त्यांनी सांगितले . जिथे विरोध करायचा तिथे नक्कीच करू , माझ्या वडिलांनी मला समाजासाठी अर्पण केले असून ” राजरत्न ” नाव ठेवून बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या विषमतेच्या लढाईत मला उतरवले आहे , तर आईने मला सूचना केल्या , की कधीच दुसऱ्याला विकु जाऊ नकोस , तुला पाहिजे तर मी घर – दागिने विकेन , असे सांगितले आहे , समाजाच्या पैशावर मी काम करेन , माझ्या या व्हिजन , या मूव्हमेंट मध्ये स्वाभिमानी राजकारण असेल , तरच या , नाहीतर येवू नका , असा सर्वांना सल्ला दिला . डॉ. बाबासाहेब यांचे पणजोबा आजोबा वडील मिलिटरी मध्ये होते , ते गुलामी नष्ट करण्यासाठीच , अडीच हजार वर्षांची गुलामी बाबासाहेबांनी घालवली , अशी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे काम झाले , मात्र त्यांची लढाई आता थांबली आहे , माझा जन्म झाल्यावर माझे नाव राजरत्न ठेवून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला समाजासाठी अर्पण केले , सामाजिक – आर्थिक – राजकीय न्याय देण्यासाठीच मी आलो आहे , यावर त्यांनी प्रकाश टाकला.

आरक्षण योध्दा जरांगे पाटील यांच्या पाठीशी मी ठाम आहे , ३० सप्टेंबर रोजी मी पुढील राजकीय भूमिका जाहीर करणार असून यावेळी होणाऱ्या कार्यक्रमात आर पी आय , वंचित चे खूप कार्यकर्ते आपल्या पक्षात प्रवेश करणार आहेत , असा गौप्य स्फोट त्यांनी या मेळाव्यात केला . हे संविधान बदलणार होते.

माझा प्रत्येक राजरत्न सुटा बुटात असला पाहिजे , असे बाबासाहेबांचे स्वप्न अशी त्यांनी व्यवस्था केली आहे , त्यांच्या योजनेवर मी काम करत आहे , यावर प्रकाश टाकत भारताचा मीडिया मला दाखवत नाही , ज्या दिवशी ते दाखवतील त्यावेळी मी विकलो गेलो असेल , हे सांगत ” तथागत बुद्ध” यांच्यासारखा संघ मला तयार करायचा आहे .
आमदार खासदार होणे माझे लक्ष नाही आम्हाला आंबेडकरी मुव्हमेंट उभी करायची आहे , तरुणांना नवी दिशा , नवी चालना , नवा राजकीय पर्याय , स्वाभिमानाचे जीवन देण्यासाठीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – १९५६ या पक्षाची स्थापना आपण केली असल्याचे , असे दमदार वाक्य डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी बोलून त्यांनी उपस्थित बहुजन वर्गाची , आंबेडकरी अनुयायांची , महिला भगिनींची मने जिंकली.

यावेळी विचार पिठावर कोकण अध्यक्ष जगदीश भाई गायकवाड , अशोक गोतारणे – जिल्हाध्यक्ष , प्रकाश गायकवाड – कर्जत ता . अध्यक्ष , मावळ अध्यक्ष अंकुश सुरावसे , जिल्हा उपाध्यक्ष गोपीनाथ सोनावणे , गौतम ढोले , संदिप गायकवाड , प्रवीण गायकवाड , नरेश गायकवाड , संदीप सुदाम गायकवाड , सुनिल सोनावणे – खालापूर ता. अध्यक्ष , सुशांत भवर , गणेश केदारी , सुनिल गायकवाड , दिपक गायकवाड , नितेश गायकवाड , आण्णा खंडागळे , प्रविण रोकडे आणि मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page