Wednesday, May 29, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतमध्ये इमारत निधी व प्रवेश शुल्काच्या नावाखाली पालकांची लूटमार,शासनाच्या आदेशाविरूद्ध पैसे उकळणाऱ्या...

कर्जतमध्ये इमारत निधी व प्रवेश शुल्काच्या नावाखाली पालकांची लूटमार,शासनाच्या आदेशाविरूद्ध पैसे उकळणाऱ्या शाळांवर कारवाई करा – अँड.कैलास मोरे..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –

कर्जतमध्ये अनेक शाळेत प्रवेश प्रकीया सुरू आहे.अनेक शाळा / कॉलेज इमारत निधी तसेच प्रवेश शुल्काच्या नावाखाली बेकायदेशीररीत्या भरमसाठ फी वसुली करून पालकांची लुटमारी करीत आहेत,व शासनाच्या नियमांची पायमल्ली करत आहेत,म्हणूनच अशा शाळा कॉलेजवर कारवाई करण्याची मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अँड.कैलास मोरे यांनी कर्जत पंचायत समिती चे शिक्षणाधिकारी तसेच अभिनव ज्ञान मंदिर प्रशाळेत तसेच मा . शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे तक्रार निवेदन देऊन केली आहे.


महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनिमय अधिनियम २०११ तसेच फी घेणे संदर्भातील इतर कायदयानुसार,शासनाने दिलेल्या आदेशानुसार अशा शाळांनी विदयार्थ्यांकडुन प्रवेश शुल्क आकारले पाहिजेत.तसेच मा.शिक्षणमंञी, महाराष्ट्र राज्य यांनी सुद्धा कोरोना तसेच लॉकडाऊन मधील परिस्थीतीचा विचार करून सरकारी व खाजगी शाळांना शाळा सुरू होईपर्यंत कुठल्याही प्रकारची फि घेण्याची नाही तसेच त्यासाठी सक्ती करणेची नाही असे आदेश दिलेले आहेत.

परंतु अनेक शाळा कायदयाचे व नियमांचे पालन न करता विदयार्थ्यांकडून इमारत निधी तसेच इतर शुल्काच्या नावाखाली पैसे वसुल करीत पालकांची लुटमारी करत आहेत तसेच शुल्क वसुलीसाठी पालक, विदयाथ्यांकडे तगादा लावत आहेत.तसेच RTE कायदया अंतर्गत पात्र विदयार्थ्यांकडुन काही शाळा बेकायदेशीररीत्या फी वसुल करीत असलेचे निदर्शनास आलेले आहे.सदरची बाब विदयार्थ्यावर अन्यायकारक अशी आहे.हयासंदर्भात अनेक पालकांनी सम्यक विद्यार्थी आंदोलनाकडे तक्रारी केलेल्या आहेत.


मार्च २०२० पासुन कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन सुरू आहे.त्यामुळे अनेकांच्या नोक-या, व्यवसाय बुडालेले आहेत.अशा परिस्थीतीत विजबिले, आरोग्य, घरखर्च, शैक्षणिक खर्च आदि खर्च आहेत.यामुळे लोकांची आर्थिक अवस्था खुप बिकट आहे.

अशा परिस्थितीत पालकांकडे त्यांच्या पाल्याची शैक्षणिक शुल्क भरणेसाठी सुद्धा पैसे नाहीत.म्हणुन कोरोना आणि लॉकडाऊनमुळे लोकांच्या झालेल्या बिकट आर्थिक परिस्थीतीचा विचार करून आपल्या कार्यक्षेत्रात असलेल्या सर्व शैक्षणिक संस्थांना आपल्यामार्फत पत्र पाठवुन बेकायदेशीररीत्या विदयार्थ्यांकडुन इमारत निधी व इतर शुल्काच्या नावाखाली फी वसुल करू नये तसेच फी संदर्भातील प्रचलित कायदे व शासननिर्णयानुसारचं शुल्क घेणेसंदर्भात पत्र पाठवुन तसे सक्त आदेश दयावेत हि विनंती शिक्षणाधिकारी यांना केली आहे.

तसेच अशाच प्रकारचे निवेदन अभिनव ज्ञान मंदिर ह्या संस्थेला देवुन शासनाच्या आदेशानुसारचं प्रवेश शुल्क घ्या अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.अशा निवेदनाची प्रत महाराष्ट्र प्रदेश शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच संबंधित सर्व अधिकारी यांना पाठविली आहे.

सदर निवेदन देताना अँड कैलास मोरे, हरिश्चंद्र यादव, सुनिल गायकवाड, अनिल गवळे, अनंता गायकवाड, धर्मेंद्र मोरे, राहुल गायकवाड, विकी जाधव, कमलाकर जाधव, लोकेश यादव,गणेश मोरे, राहुल गायकवाड, सचिन वाशिकर, सुनिल मोरे आदी सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page