Thursday, October 10, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतमध्ये खासदार आप्पासाहेब बारणे यांचा नुकसानग्रस्त भागात पाहणी दौरा..

कर्जतमध्ये खासदार आप्पासाहेब बारणे यांचा नुकसानग्रस्त भागात पाहणी दौरा..

नुकसान झालेल्या नागरिकांना तत्काळ मदत करा,अधिकाऱ्यांना सूचना…

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
अतिवृष्टीमुळे मागील पाच दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदीला मोठा पूर येऊन कर्जत नगर परिषद हद्दीत सर्वच प्रभागात पाणी शिरले होते.नदी काठच्या अनेक घरामध्ये पाच ते दहा फूट पाणी शिरले त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या नुकसान झालेल्या भागाची पाहणी मावळ मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग तथा आप्पासाहेब बारणे यांनी केली व लागलीच पुराने नुकसान झालेल्या नागरिकांना तत्काळ मदत करावी ,त्याचे पंचनामे करावेत ,वीज पुरवठा सुरळीत करावा, पाणी पुरवठा पूर्ववत करावा,अश्या सूचना यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.कर्जत नगरपालिका हद्दीत उल्हास नदी ही शहराच्या मध्यभागातून वाहते.

त्यामुळे जर पावसाच्या पाण्याने पाण्याची पातळी वाढली तर त्याचा फटका पालिका क्षेत्रातील सर्वच प्रभागाला बसतो . त्यामुळे २१ जुलै २०२१ ला संततधार पावसाने रात्रीच्या वेळी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाल्याने नदीकाठच्या भागातील अनेक घरामध्ये पाणी शिरले होते.

झालेल्या नुकसानग्रस्त नागरिकांचे मनोधैर्य वाढवून खासदार आप्पासाहेब बारणे यांनी पाणी शिरलेल्या बामचा मळा, इंदिरानगर,छत्रपती शिवाजी महाराज नगर, शिवम अपार्टमेंट, आकुरले ,दहिवली ,भागाची तीन तास पाहणी केली. नागरिकांना धीर दिला. त्या नंतर प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली.

पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना तत्काळ मदतीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्याचबरोबर रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. पुराने बाधित नागरिकांना तत्काळ मदत करण्याच्या त्यांनाही सूचना दिल्या.यावेळी खासदार आप्पासाहेब बारणे यांच्या समवेत कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ.सुवर्णा केतन जोशी, प्रांत अधिकारी वैशाली परदेशी, तहसीलदार विक्रम देशमुख, मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील, नायब तहसीलदार सुधाकर राठोड,मंडल अधिकारी थिअरीकर, नगरसेवक विवेक दांडेकर, महिला व बालकल्याण सभापती संचिता पाटील, उपसभापती प्राची डेरवणकर , माजी नगरसेवक संतोष पाटील, उद्योजक केतन जोशी,संदीप करनुक, संदीप पाटील, ज्ञानेश्वर करनुक आदी बैठकीला उपस्थित होते.

यावेळी खासदार बारणे म्हणालेकी ,कर्जत नगर पालिकेच्या हद्दीत नागरिकांच्या घरामध्ये पाणी गेल्याने मोठे नुकसान झाले आहे .टीव्ही, फ्रीज, मिक्सर अशा इलेक्ट्रॉनिक साहित्या बरोबरच फर्निचर ,गाद्या ,बेड ,व अन्नधान्याचेही नुकसान झाले. पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने प्राथमिक स्तरावर पंचनामे करावेत.पंचनामे झाल्यानंतर शासनाकडून सर्व नुकसान ग्रस्तांना ही मदत मिळावी.

अशी मागणी करणार असून अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाला त्यांची कामे तत्काळ पूर्ण करून वीज पुरवठा सुरळीत करावा तसेच पंपिंग स्टेशनमध्ये पाणी गेल्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल्याने विस्कळीत झालेला पाणीपुरवठा तत्काळ पूर्ववत करावा.पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी,अशा सूचना मावळचे खासदार आप्पासाहेब बारणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

- Advertisment -

You cannot copy content of this page