Thursday, July 25, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतमध्ये पहेलवानांचा आखाड्यात धुमशान ,दिपक मोहिते-पुणे ठरला अजिंक्य !

कर्जतमध्ये पहेलवानांचा आखाड्यात धुमशान ,दिपक मोहिते-पुणे ठरला अजिंक्य !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जतकरांचे ग्रामदैवत श्री धापया महाराज यांचा उत्सव अक्षय तृतिये पासून सुरू झाला. त्या निमित्ताने शंभर वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा असलेला व कै .रमेश चंदन पाटील , हसन शेख , मामा शेलार , दत्ता हजारे , दत्ता देशमुख यांनी सुरु केलेल्या कुस्तीच्या आखाड्यात आयोजित केलेल्या कुस्त्यांमध्ये शेवटच्या मानाच्या कुस्तीत झालेल्या अटीतटीच्या लढतीत पुण्याचा दिपक मोहिते अजिंक्य ठरला त्याने नाशिकचा कुस्तीपट्टू ज्ञानेश्वर केरे यास चितपट करत मानाची २१००० /- रुपयांची कुस्ती जिंकून धापया महाराज उत्सवाचा आखाड्यातील धुरळा आपल्या अंगावर उडविला . गेल्या वर्षी प्रमाणे यावेळी देखील महिलांच्या ६ कुस्त्या झाल्या . या मानाच्या कुस्तीस कर्जत न.प.च्या नगराध्यक्षा सौ. सुवर्णा जोशी यांनी २१ हजारांचे बक्षीस दिले होते.

कर्जत तालुका कुस्तीगीरी संघाचे अध्यक्ष श्री भगवान धुळे व धापया देवस्थान समितीच्या पदाधिकारी यांच्या हस्ते कुस्तीगीर आखाड्याचे उदघाटन झाल्यावर सकाळ पासून रात्री पर्यंत एकूण १५० च्या वर व महिला कुस्त्या ६ झाल्या. दोन्ही सत्रात पंच म्हणून दिपक भुसारी , दत्ता मामा म्हसे यांनी काम पाहिले.

शेवटची महत्वपूर्ण कुस्ती कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ .सुवर्णा जोशी यांनी दिलेले २१ हजार रुपयांची अटीतटीच्या झालेल्या कुस्तीत दिपक मोहिते – पुणे याने नाशिक – येवला चा मल्ल ज्ञानेश्वर केरे यांस असा काही डाव टाकला कि , अखेर त्याची पाठ आखाड्यात टेकवून ” विजयश्री ” आपल्या नावावर कोरली . यावेळी प्रथम नगराध्यक्ष व धापया देवस्थानचे अध्यक्ष कै .रमेश चंदन (पाटील ), यांच्या स्मरणार्थ महेंद्र चंदन , मंगेश दत्तात्रेय देशमुख , महेंद्रशेठ थोरवे , मनोहर थोरवे , सुधाकरशेठ घारे , प्रशांत ( बाबू ) पाटील , राजू शेठ वाळूज , अरुण गुप्ता , पंकज बडेकर , पप्पू गुरव , योगेश देशमुख , यांनी बक्षीस लावून कुस्त्या खेळवल्या गेल्या.

सूत्रसंचालन दिलीप ठाकरे यांनी केले. यावेळी दिल्ली, हरियाणा,  मुंबई , नवी मुंबई , कल्याण , पुणे, सातारा, सोलापूर, रायगड , जालना, उस्मानाबाद, नाशिक , पंढरपूर , वाराणसी आदी भागांतून आलेले पहेलवान या कुस्ती स्पर्धेत सहभागी झाले होते. कर्जतचा राकेश , या तरुण कुस्ती पट्टूची १५ हजार रुपयांची कुस्ती खूपच आकर्षक व अप्रतिम ठरली . यावेळी कर्जत तालुक्याच्या ग्रामीण भागातून तसेच शहरातून आलेले असंख्य कुस्ती प्रेमी यावेळी उपस्थित होते .अध्यक्ष गणेश संजय शिंदे , उपाध्यक्ष – प्रकाश दामोदर आणेकर , खजिनदार – महेंद्र बबन चंदन ( पाटील ) , सहखजिनदार – गौरव चंद्रकांत भानुसघरे , चिटणीस – मनोज चंद्रकांत वरसोलिकर , सहचिटणीस – सचिन एकनाथ दगडे , जनार्दन परांजपे , लक्ष्मण चंदने , मुकेश पाटील , मोहन भोईर , अजय वर्धावे , नितीन गुप्ता , राकेश पाटील या धापया देवस्थान कमिटी व ईतर कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हा अक्षय तृतीया उत्सव व कुस्त्या मोठ्या उत्साहात पार पडला.
- Advertisment -

You cannot copy content of this page