Friday, February 23, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतमध्ये रस्ता सुरक्षा अभियान-२०२४ चे मार्गदर्शन !

कर्जतमध्ये रस्ता सुरक्षा अभियान-२०२४ चे मार्गदर्शन !

भिसेगाव ( सुभाष सोनावणे ) वाहतुकीचे नियम पाळून ” स्वतःच स्वतःची सुरक्षा करा ” , असे आवाहन आज रायगड जिल्हा पोलीस – जिल्हा वाहतूक शाखा यांच्या नेतृत्वाखाली कर्जत वाहतूक शाखेचे पोलीस उप निरीक्षक कमलाकर मुंढे यांच्या पुढाकाराने कर्जत नगर परिषद हद्दीतील कर्जत रेल्वे स्थानक तीन आसनी रिक्षा चालक मालक संघटना , स्टँड नंबर – १ येथे सर्व रिक्षा चालक मालकांना रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत मार्गदर्शन करण्यात आले.

रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. सोमनाथ घार्गे व अप्पर पोलीस अधिक्षक श्री. अतुल झेंडे यांच्या आदेशाने जिल्ह्यात वाहतूक शाखेच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान – २०२४ दिनांक १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी २०२४ पर्यंत सुरू आहे . यानिमित्ताने कर्जत मध्ये पोलीस निरिक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरिक्षक कमलाकर मुंढे व सहा पोलीस उपनिरीक्षक मुकुंद दरेकर – वाहतूक शाखा यांनी कर्जत रेल्वे स्थानक रिक्षा चालक मालक संघटना स्टँड नंबर – १ येथे जाऊन वाहतुकीच्या नियमांचे व सुरक्षितताबाबत मार्गदर्शन केले . वाहतुकीच्या नियमांचे पालन करा , मद्यपान करून वाहतूक करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे आहे , दुचाकी वाहन धारकांनी डोक्याला हेल्मेटचा वापर करा , आपल्या गाडीचे कागदपत्रे , लायसन्स बरोबर बाळगा , महिला प्रवासी , ज्येष्ठ नागरिकांशी अदबीने वागा , रात्रीच्या वेळी गुन्हे होणार नाही म्हणून काळजी घ्या , असे सर्व नियम पाळून आपली सुरक्षा करा , असे आवाहन पोलीस उप निरिक्षक कमलाकर मुंढे , सहा पोलीस उपनिरीक्षक मुकुंद दरेकर – वाहतूक शाखा यांनी समस्त रिक्षा धारकांना केले.

यावेळी कर्जत रेल्वे रिक्षा चालक मालक संघटना, स्टँड नंबर – १ संघटनेचे अध्यक्ष तथा प्रथम उपनगराध्यक्ष उत्तम भाई जाधव यांच्या वतीने सल्लागार पत्रकार सुभाष सोनावणे , स्टँड प्रमुख विनोद मोरे , आण्णा दाभणे, रामदास थोरवे , महेश दिसले , दिपक दांडेकर , संजय थोरवे , लक्ष्मण थोरवे , डफले , भालचंद्र भोईर , नरेश थोरवे , अनंता ताम्हाणे , विजय थोरवे , आदी रिक्षा चालक उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page