Saturday, November 2, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतमध्ये वृक्षारोपण करून पर्यावरण मंत्री तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस साजरा..

कर्जतमध्ये वृक्षारोपण करून पर्यावरण मंत्री तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस साजरा..

आमदार महेंद्रशेट थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक संकेत भासे यांचा पुढाकार..

भिसेगाव-कर्जत /सुभाष सोनावणे-
महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून कर्जत-खालापूर विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेट थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरसेवक संकेत भासे यांच्या पुढाकाराने युवासेना आणि शिवसेनेच्या वतीने कर्जतमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.कोरोना काळात ऑक्सिजनचा भासलेला तुटवडा लक्षात घेता वृक्ष संवर्धन आणि लागवड करणे गरजेचे असल्याने हा उपक्रम येथे राबविण्यात आला.

कर्जत हे हिरव्यागार नवलाईने नटलेलं निसर्गाचा वरदहस्त लाभलेलं छोटंसं शहर आहे. त्यामुळे कर्जतचं सौंदर्य अबाधित ठेवून नंदनवन बनवण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने कर्जत शहराला विशेष महत्व प्राप्त असल्याने कर्जतच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावा आणि त्यांचं संवर्धन करा असे आवाहन आज शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने करण्यात आले.

वृक्षारोपण कार्यक्रमासाठी कर्जत नगर परिषदेचे नगरसेवक संकेत भासे यांच्या पुढाकाराने एकता नगर दहिवली येथील रहिवासी आणि सामाजिक कार्याची आवड असणारा तरुणवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. तर यावेळी नगरसेवक संकेत भासे ह्यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण करून संवर्धनाची शपथ सर्वांनी घेत एक आगळ्या वेगळ्या शुभेच्छा त्यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना दिल्या.


सदर वृक्षारोपण प्रसंगी शिवसेना पदाधिकारी पंकज पाटील , युवासेना उप तालुका अधिकारी प्रसाद थोरवे, माजी उपशहर प्रमुख अभिषेक सुर्वे ,शिवसेना उप विभागप्रमुख दहिवली विशाल बैलमारे,अजय सुवरणे,उदय जाधव ,हर्षद जाधव,वैभव खोपडे,विशाल खोपडे,प्रणित सपकाळ,विनायक गायकवाड,स्वप्नील शाहू ,चेतन देशमुख ,अतुल बोराडे,रोहित जाधव,अनिकेत कारंडे ,प्रवीण बिबवे,ऋषिकेश जाधव,योगेश पवार ,रोहन नागोठकर आणि इतर तरुण , शिवसैनिक उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page