Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतमध्ये शिवसेना आयोजित राज्यस्तरीय व तालुकास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन !

कर्जतमध्ये शिवसेना आयोजित राज्यस्तरीय व तालुकास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) शिवसेना – उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने उपजिल्हाप्रमुख नितीन दादा नंदकुमार सावंत आयोजित महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने राज्यस्तरीय व तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे भव्य आयोजन कर्जत येथे केले असून पुन्हा एकदा उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत ” प्रसिद्धीच्या झोतात ” येणार आहेत. कर्जत नगर परिषद हद्दीतील शिवालय ऑफिस समोरील ग्राउंड , रॉयल गार्डन शेजारी, कर्जत – रायगड येथे हे भव्य कबड्डी सामने दि. ०१ ते ०३ मार्च २०२४ रोजी ठीक सायंकाळी ५ वाजता सुरू होणार आहेत.

कबड्डी खेळ हा आपल्या ” मराठी मातीतील खेळ ” असून त्याचे शौकीन रायगड जिल्ह्यात पूर्वापार आहेत . कर्जत तालुक्यात हा खेळ खूपच प्रसिद्ध असून या खेळाडूंना खेळ खेळण्यास वाव मिळवून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी उत्तेजन देण्यासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख तथा ज्येष्ठ नगरसेवक नितीन दादा सावंत दरवर्षी लाखो रुपयांची व आकर्षक बक्षिसे असलेले कबड्डी सामने भरवित असतात . कर्जतच्या पोलीस मैदानावर माय भगिनिंसाठी ” हळदी कुंकू ” समारंभ व ” खेळ मांडियेला ” या आदेश बांदेकर आयोजित ” अटकेपार गर्दीत ” झालेल्या कार्यक्रमानंतर खालापूर येथे झालेल्या ” बैल गाडा शर्यतीला मिळालेल्या उत्स्फूर्त यशानंतर ” आता हे भव्य राज्यस्तरीय व तालुकास्तरीय कबड्डी सामने त्यांनी भरविले आहेत.

होणाऱ्या राज्यस्तरीय सामन्यांना बक्षिसे म्हणून पहिला क्रमांक 1,00,000/- रू. दुसरा क्रमांक 75,000/- रू. तिसरा क्रमांक 50,000/-रू. तर चौथा क्रमांक 50,000/-रू. असणार आहेत.

सर्वोत्कृष्ट खेडाळू – बाईक , सर्वोत्कृष्ट पक्कड – स्पॉट् स्पोर्ट्स सायकल ,सर्वोत्कृष्ट चढाई-स्पोर्ट्स सायकल,हि बक्षिसे असून
तालुकास्तरीय बक्षिसे पहिला क्रमांक ५०,०००/- रू. दुसरा क्रमांक ३०,०००/-रू. तिसरा क्रमांक २०,०००/-रू. तर चौथा क्रमांक २०,०००/-रू असणार आहे . या भव्य कबड्डी सामन्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अंबादास दानवे ( विधानपरिषद विरोधीपक्ष नेते ) – १ मार्च २०२४ , अनंत गीते ( शिवसेना नेते / मा. केंद्रीय मंत्री ) – २ मार्च २०२४ , सचिन अहिर ( शिवसेना उपनेते / विधानपरिषद आमदार ) ३ मार्च २०२४ रोजी उपस्थित रहाणार असून बबनदादा पाटील (रायगड जिल्हा संपर्क प्रमुख ) , संजोग वाघेरे (पाटील) ( मावळ लोकसभा संघटक ) , केसरीनाथ पाटील ( मावळ लोकसभा समन्वयक ) , मनोहर शेठ भोईर – मा. आमदार ( रायगड जिल्हा प्रमुख ) ,भाई शिंदे ( रायगड जिल्हा सहसंपर्क प्रमुख ) , रियाजशेठ बुबेरे ( रायगड जिल्हा सल्लागार ) , एस. एम. पाटील (रायगड जिल्हा सल्लागार ) , नवीनदादा घाटवळ ( रायगड जिल्हा सल्लागार ) , गजानन पडगे (रायगड जिल्हा सल्लागार ) , सौ. सुवर्णा जोशी ( रायगड जिल्हा महिला संघटिका ) तथा नगराध्यक्षा कर्जत , आदी मान्यवर व सर्व शिवसेना ( उबाठा ) – युवा सेना – महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

येणाऱ्या संघाने संपर्क – महाराष्ट्र राज्य महेश लोट- ९८६७५७०७८० , अनिकेत म्हात्रे – ९०२८९४६४६७ तर संपर्क- कर्जत खालापूर तालुका – प्रमोद खराडे – ७७९८९९६५२२ , योगेश दिघे – ९६७३४७५३५६ , आकाश जाधव – ७७७५८०६७ , सतीश कोकणे – ९३२६४३७४६५ , महेंद्र मोरे – ९०२८२८१५६० यांच्याशी संपर्क करण्याचे व जास्तीत जास्त कबड्डी संघाने यांत भाग घेण्याचे आवाहन आयोजक नितीन नंदकुमार सावंत – उपजिल्हाप्रमुख कर्जत खालापूर विधानसभा , गटनेता : नगरसेवक कर्जत नगरपरिषद यांनी केले आहे . या खेळात विशेष सहकार्य नवकुमार क्रिडा मंडळ – मुद्रे , नवतरुण क्रिडा मंडळ – मुद्रे , शिवतेज स्पोर्ट क्लब – नानामास्तर नगर , मिडलाईन अकॅडमी – कर्जत यांचे असणार आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page