Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतमध्ये "हजरत सय्यद युसूफशाह बाबांचा उरूस " उत्साहात साजरा !

कर्जतमध्ये “हजरत सय्यद युसूफशाह बाबांचा उरूस ” उत्साहात साजरा !

भिसेगाव -कर्जत (सुभाष सोनावणे ) सालाबाद प्रमाणे ह्या वर्षी देखील सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेले  “हजरत  सय्यद युसूफ शाह बाबांचा ” उरूस  दि .६ एप्रिल २०२३ रोजी मोठ्या उत्साहात साजरा झाला , यानिमित्ताने बाबांच्या भक्तांनी व उरूस कमिटी ने जय्यत तयारी केली होती , मात्र रमजान महिना असल्याने शहरांमधून संदल मिरवणूक निघाली नाही.
 हजरत सय्यद युसूफ शाह बाबांचा कर्जतमधील दर्गा मुंबई पासून पुण्या पर्यंत प्रसिद्ध आहे .या बाबांचे हजारो भक्त असून सर्व जाती धर्माचे आहेत .जवळ जवळ १०० वर्षे येथे बाबांच्या उरुसाला होत असल्याचे समजते . प्रतिवर्षी या उरुसाला सर्वच समाजाचे भक्तगण , मुस्लिम समाज आवर्जून उपस्थित रहातात .बाबांच्या दर्ग्यात मागितलेली मन्नत पूर्ण होते ,अशी भक्तांची धारणा असल्याने पूर्ण झालेली मन्नत फेडण्यासाठी अनेक कुटुंब या दिवशी येतात .जुने आजार , वाईट पीडा , दोष धारणा ,भूत-प्रेत बाधा ,यासारखे बाधीत कुटुंबे इथे येतात , त्याचप्रमाणे बाबांच्या या दर्ग्याचे मुंबई पासून पुण्यापर्यंत व रायगड जिल्हा , कर्जत तालुक्यातील असलेले भक्त येथे सकाळपासून हजर रहातात. येथे अनेक भक्त प्रसाद वाटप करतात .तर हजरत  कमलुद्दीन शाह बाबा उर्फ सर्कीट शाह बाबा मुंबई -गोवंडी कमिटी अध्यक्ष संजय इंगळे आणि मित्र परिवार यांनी येणाऱ्या भक्तांना न्याज ( जेवण ) ठेवले होते.
हजरत सय्यद युसूफ शाह बाबांच्या उरुसाला अनेक सेवाभावी संघटना ,मंडळे यांनी सरबत , नाश्ता , प्रसाद म्हणून भाविकांसाठी ठेवले होते .मोठ्या उत्साहात हा उरूस साजरा करण्यात आला.यावेळी कर्जत न.प. च्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी , नगरसेवक संकेत भासे , नगरसेवक बळवंत घुमरे , शिवसेना शहर प्रमुख अभिषेक सुर्वे , शिवसेना कर्जत शहर संघटक नदीम खान , दिनेश कडू त्याचप्रमाणे अनेक राजकीय ,धार्मिक मंडळी , मुस्लिम समाज कमिटी , व सर्व मुस्लिम समाज , यांनी सकाळपासूनच दर्शनाचा लाभ घेतला .यावेळी नदीम खान यांच्या विनंतीनुसार कर्जत – खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी दर्गा परिसरातील रोषणाईसाठी सहकार्य केले.
तर शिवसेना शहर संघटक नदीम खान यांनी अहोरात्र मेहनत घेऊन आमदार निधीतून मंजूर झालेल्या दर्गा रस्ता व त्याचे सुशोभीकरण , आकर्षक रोषणाई , शनी मंदिर येथील गार्डन व त्याचे सुशोभीकरण , बोरी कब्रस्तान यांचे कंपाउंड आदी कामे लवकरच भूमिपूजन होऊन मार्गी लागतील , असे शिवसेना कर्जत शहर संघटक नदीमभाई खान यांनी सांगितले.
- Advertisment -

You cannot copy content of this page