कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लस घेण्यासाठी गर्दीचा उच्चांक !

0
364

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
कर्जतमध्ये कोरोना लस घेण्यासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात प्रचंड प्रमाणात गर्दी होत असून यामुळे शासनाने दिलेले कुठलेच नियम पाळले जात नाहीत,यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती आता दिसू लागली आहे.राज्य सरकारने कोरोनाचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासास मुभा दिली आहे.

त्यामुळे अनेकांना रोजगारासाठी याचा फायदा होणार असल्याने आतापर्यंत लसीकरण ज्यांनी केले नाही असे नागरिक ,तरुणाई लस घेण्यासाठी कर्जत तालुक्यात लसीकरण केंद्रावर झुंबड उडत आहे.आज कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कोव्हीशिल्डचा पहिला डोस १०० डोस ऑफ लाईन व १०० डोस ऑनलाइन पद्धतीने मिळणार असल्याने तर कोव्हीशिल्ड चा दुसरा डोस ऑफलाईन २०० डोस असल्याने लस घेणा-यांनी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात एकच गर्दी केली.

यांत कर्जत तालुक्याच्या बाहेरचे नागरिकांनी देखील याचा फायदा घेण्यासाठी लस केंद्रावर आल्याचे चित्र दिसत आहे.काल सोशल मीडियावर व्हाट्स अप च्या माध्यमातून ही बातमी सर्वत्र आल्याने फक्त कर्जतकर नागरिकांना याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा , म्हणून सर्वांनी इथे हजेरी लावली. ऑगस्ट महिन्यांपासून सण – उत्सव यांना सुरुवात झाली आहे.पुढे येणाऱ्या गणपती उत्सव , नवरात्र व दिवाळी सणात सुखरूप प्रवास करण्यासाठी कोरोनाचे दोन डोस घेणे गरजेचे वाटत असल्याने तरुणाई व इतर नागरिकांनी आज तोबा गर्दी केली.मात्र या गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता व भीती वर्तविण्यात येत आहे.

यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज कर्जत उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी यांनी व कोरोना संसर्ग रोखणा-या यंत्रणेने करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे .