Sunday, April 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत कल्याण राज्यमार्ग वर डिकसळ परिसरात गतिरोधक व्यवस्था.अखेर पोलिस मित्र संघटना यश….

कर्जत कल्याण राज्यमार्ग वर डिकसळ परिसरात गतिरोधक व्यवस्था.अखेर पोलिस मित्र संघटना यश….

दि.25कर्जततालुक्यातील कर्जत कल्याण राज्यमार्ग वरील डिकसळ परिसरातील भागातील गतिरोधक पाठपुरावा करून अखेर यश आले आहे. यावेळी पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत यांनी 7 फेब्रुवारी 2020 रोजी पोलीस मित्र संघटना यांनी उपविभागीय अभियंता(pwd) कर्जत यांना आपल्या पत्राद्वारे लेखी निवेदन देण्यात आले होते.

यावेळी उपविभागीय अभियंता(pwd) कर्जत सर्व बाबी लक्षात घेऊन कर्जत कल्याण राज्यमार्गावर गतिरोधक बसविण्यात येणार आहे असे निवेदिका काढण्यात आले आहे.

तसेच कर्जत कल्याण राज्यमार्गावर संपूर्ण सिमेंट कॉक्रीटी रस्ताचे काम करण्यात आले आहे.त्याप्रमाणे राज्य मार्ग असल्याने वाहने भरधाव वेगाने येत असतात.राज्यमार्गावर गाव शाळा आणि रहदारी वर्दळ ही असताना रस्ता ओलंटाना प्रवाशांना आणि शाळकरी विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत असतो.

यावेळी कर्जत कल्याण राज्यमार्गावर डिकसळ परिसरात लगत विविध ठिकाणी गतिरोधक आणि फायबर ब्रेकर बसविण्यात यावे गतिरोधक बसविण्यात ठिकाण उमरोली प्रवेशद्वार,डॉ.बाबासाहेब आंबेडकर डिकसळ मार्ग शांतीनगर प्रवेशद्वार,रा.जि.प.शाळा डिकसळ(मध्यवर्ती ठिकाण),मा.भाऊसाहेब राऊत विद्यालय डिकसळ,चिंचवली प्रवेशद्वार इत्यादी ठिकाणी बसविण्यात येणार आहेत.तसेच शाळा आणि विद्यालय अशी पाटी लावण्यात येणार आहे

यावेळी पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत राष्ट्रीय अध्यक्ष संतोषदादा चौधरी यांच्या सहकार्याने रायगड जिल्हा अध्यक्ष किशोर शितोळे,पोलीस मित्र संघटना रायगड जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे यांच्या पुढाकाराने पोलीस मित्र संघटना रायगड जिल्हा सचिव सुप्रेश साळोखे,पोलीस मित्र संघटना
रायगड जिल्हा संघटक आणि रायगड भूषण किशोर गायकवाड, पोलीस मित्र संघटना जिवक गायकवाड आदीसह यांनी उपविभागीय अभियंता(pwd) कर्जत यांना आपल्या पत्राद्वारे लेखी निवेदन अखेर मागणीला यश मिळाले आहे.पोलिस मित्र संघटनाच्या माध्यमातून आणि प्रवास वर्गांकडून प्रशासनचे समाधान व्यक्त करीत आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page