
रिक्षाचा सीएनजीचा स्फोट होऊन लागली भीषण आग दोन्ही वाहने जळुन खााक..
खोपोली। दत्तात्रय शेडगे
कर्जत तालुक्यातील कर्जत कल्याण रोडवर डिकसलं गावाजवळ कार आणि रिक्षाचा समोरा समोर धडक देऊन भीषण अपघात झाला या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर रिक्षाच्या सीएनजी बाटल्याचा स्फोट होऊन भीषण आग लागली.
कर्जत कल्याण रोडवर आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास डिकसल जवळ कार आणि रिक्षाची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर रिक्षाच्या सीएनजी बाटल्याचा स्फोट होऊन दोन्ही वाहनांना भीषण आग लागली या अपघातात दोन महिला एक पुरुष व एका लहान बाळाचा अपघातात समावेश असून अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही.