Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत - खालापूर मतदार संघातील सर्व समाज बांधवांना विकास कामांच्या माध्यमातून समान...

कर्जत – खालापूर मतदार संघातील सर्व समाज बांधवांना विकास कामांच्या माध्यमातून समान न्याय देणार – कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे

शिवसेना शहर संघटक नदीम खान यांच्या विशेष प्रयत्नाने शनी मंदिर ते दर्गा रस्ता व सुशोभिकरण , बोहरी समाज कब्रस्तान काम व दर्गा सुशोभिकरण उद्घाटन आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या शुभहस्ते संपन्न..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) आपल्या शिवसैनिकांच्या कामाच्या मागणीचा आदर करत गाव – शहर – परिसर – विभाग – वाड्या – पाड्यात लाखो रूपयांचा निधी मंजूर करून विकास कामांची गंगा आणून कामे पूर्णत्वाकडे नेण्याचा झंझावात कर्जत – खालापूर मतदार संघाचे कार्य सम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचा सुरू असून सर्व समाज बांधवांना विकास कामांच्या माध्यमातून समान न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न खरोखरच वाखानण्याजोगे आहे.
आज शनी मंदिर ते दर्गाह रस्त्याचे काम व आजूबाजूचे सुशोभिकरण तसेच बोहरी समाजाच्या कब्रस्तान वोल कंपाऊंड भूमिपूजन आणि हजरत सय्यद इसुब शाह बाबा दर्गाह सुशोभिकरणाच्या कामांचे उद्घाटन कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले . यावेळी या महत्त्वपूर्ण मुस्लिम समाज व बोहरी समाजाला कामाच्या माध्यमातून न्याय देण्याच्या कार्यक्रमास आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या समवेत कर्जत न.प. च्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी , उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल , नगरसेवक राहुल डालिंबकर , शिवसेना उपजिल्हाप्रमुख भाई गायकर , विधानसभा संघटक शिवराम बदे , संघटक पंकज पाटील ,कर्जत ता . प्रमुख संभाजी जगताप , नगरसेवक बैजू घुमरे , माजी नगरसेविका बिनिता घुमरे , अमोल पाटील , बाबू पोटे , ता . संघटक रमेश मते , सुभाष पाटील , नगरसेवक संकेत भासे , शहर प्रमुख अभिषेक सुर्वे , उपशहर प्रमुख मोहन भोईर , पालिकेचे अभियंता मनीष गायकवाड , सार्वजनिक बांधकाम विभागाचे थोरात त्याचप्रमाणे मुस्लिम समाज धर्मगुरू , दर्गाह मुस्लिम कमिटी , मुस्लिम समाज बांधव , बोहरी समाज धर्मगुरू व कमिटी व समाज बांधव व शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच यावेळी ख्रिचन समाजाचे फादर लुईस व डिमेलो यांनी देखील आमदार महेंद्र शेठ थोरवे यांची भेट घेवून काही मागण्या केल्या . कर्जत नगर परिषद हद्दीतील विविध विकास कामांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुस्लिम समाज व बोहरी समाज यांनी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे जाहीर आभार मानले .यावेळी झालेल्या छोटेखानी समारंभात आमदार महेंद्र शेठ थोरवे म्हणाले की , २० वर्षापूर्वी वैयक्तिक संकट आल्याने येथे दर्ग्यात पाया पडण्यासाठी आलो होतो , त्यावेळी संकट पार पडले व आता आमदार झाल्यावर मी येथे दर्शनासाठी व येथे केलेल्या कामांचे लोकार्पण करण्यासाठी आलो आहे , दर्गाह चे काम खूप छान केले आहे , येथील या कामामुळे वातावरण प्रसन्न झाले आहे.
दर्गाह रस्त्यासाठी ९० .५ लाख रु . चे निधी दिला आहे , ओपन जिम , विविध शो ची झाडे , सुशोभिकरण असे निसर्गरम्य ठिकाण आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत , बोहरी समाजाला कब्रस्तान कंपाऊंड २० लाख निधी मंजूर होवून काम सुरू होईल , सर्व बोहरी समाज व्यापारी नम्र असल्याचे त्यांनी सांगितले , अनेक कार्यकर्त्यांना उधारी वर सामान देवून काम करण्यासाठी सहकार्य त्यांनी केले आहे , त्यांच्या सहकार्यामुळे कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचे काम बोहरी समाजाने केले आहे , असे गौवोद्गार त्यांनी काढले.
मुस्लिम समाजानें देखील मला निवडून येण्यासाठी खूप मोलाचे सहकार्य केले आहे , म्हणून सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत , उल्हास नदी आम्ही साफ स्वच्छ केली आहे , पुरापासून नागरिकांचा बचाव केला आहे , ९६ कोटी रूपयांचा निधी कर्जत चौक रस्ता होण्यासाठी मंजूर केल्याने हा मार्ग रुंद होणार आहे , पर्यटनाच्या माध्यमातून कर्जत तालुक्याची योग्य डेव्हलपमेंट होणार आहे , १०० एकर जागेत तरुणांना रोजगार देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत , कर्जत तालुक्यात फार्महाऊस , रिसॉर्ट होत आहेत , हॉटेल व्यवसायामुळे व्यापार मिळत आहे , सर्व देशाची अर्थ व्यवस्था हि पर्यटनावर अवलंबून असल्याने पर्यटन वाढला पाहिजे , सर्व मोठ्या शहरातील उद्योजक येथे येत आहेत , पर्यटनाला चालना देवून कर्जतचां विकास साधणार आहोत ,यावर त्यांनी प्रकाश टाकला.
कर्जत नगरीचे प्रवेशद्वार आपण सजावट करणार आहोत , त्यामुळे भविष्यात ऐतिहासिक डेव्हलपमेंट होणार आहे , सक्षम कर्जत उभे रहाणे गरजेचे असल्याने पालिकेने समाज बांधवांसाठी जागा देण्याचा प्रयत्न करा , मी निधी देणार आहे , संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करणार असून आजपर्यंत ८०० कोटीं निधिंची कामे आपण आणली आहेत , असे मत आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी मांडले.

याप्रसंगी नगराध्यक्षा सौ .सुवर्णा जोशी यांनी या कर्जत नगरीत सर्व समाजात एकोपा आहे , आपण सर्व सण एकत्रित येवून आनंदाने साजरे करतो , या नगरीची मी नगराध्यक्षा असल्याचा मला अभिमान असल्याचे सांगून या परिसरातील अनेक समस्या होत्या पण आमदार साहेबांच्या प्रयत्नाने निधी उपलब्ध झाला , म्हणूनच येथे विकास होवू शकत आहे , असे मत मांडत छोटी मोठी कार्यक्रम करण्यासाठी येथे हॉल ची व्यवस्था करू , असे आश्वासन त्यांनी दिले.
तर हुसेन सर यांनी बोहरी समाजाचे येथे १०० वर्षे वास्तव्य असून नेहमीच सामाजिक कार्यात पुढाकार असतो , हा समाज येथील मातीशी इमान राखत आहे , १२ वर्षे झाली दफन भूमीची जागा मिळाली , अनेक समस्या होत्या पण आता मार्गी लागतील , मयत विधी रूम , लाईट , पाणी सेवा ही उपलब्ध व्हावी , अशी मागणी करत आताच्या कामांत शिवसेना संघटक नदीम खान यांचे मोलाचे सहकार्य लाभले , असे मत मांडले.

तर नगरसेवक राहुल डाळिंबकर यांनी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचा विकास कामांच्या माध्यमातून झंझावात सुरू असून आजपर्यंत कुठल्याच आमदारांनी इतका मोठा निधी आणला नाही , पालिका क्षेत्रात देखील खूप मोठा निधी दिला आहे , यावर प्रकाश टाकला . तर या कामाचे प्रयत्नास ज्याना श्रेय जाते ते शिवसेना शहर संघटक नदीम भाई खान यांनी आपण आमदार साहेबांना केलेल्या विनंतीनुसार हा निधी उपलब्ध झाला असून अनेक वर्षे या दर्गाह रस्त्याचे काम झाले नव्हते ते आता पूर्ण होवून कर्जत नगरीला या सुशोभिकरणाच्या कामामुळे सुवर्ण झालर लागलेली दिसेल , व बोहरी समाज , मुस्लिम समाज बांधवांचा अखेरचा प्रवास सुखरूप व्हावा , यासाठी हा प्रयत्न असल्याचे भावनिक मत त्यांनी व्यक्त केले , उद्या पासूनच सर्व कामे सुरू होणार आहेत ,बोहरी व मुस्लिम समाजाला न्याय दिलात ,म्हणून आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे आभार व्यक्त केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page