Wednesday, May 29, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत तालुका व शहरात महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांचा प्रचार "...

कर्जत तालुका व शहरात महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांचा प्रचार ” सुपर से भी उपर “

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) गाड्यांच्या ताफ्यात , हजारो महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी घेवून प्रत्येक ठिकाणी ओवाळणी , फुलांच्या उधळणीने स्वागत होत हॅट्रिक च्या दिशेने वाटचाल करत कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या साथीने मावळ लोकसभा मतदारसंघ , सार्वत्रिक निवडणूक २०२४ शिवसेना – भाजपा – राष्ट्रवादी काँग्रेस – रासप – आरपीआय – मनसे – महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा चंदू बारणे यांचा कर्जत तालुका ग्रामीण व कर्जत शहर प्रचार दौरा ” सुपर से भी उपर ” ठरला . जोरदार शक्तिप्रदर्शन करत मंगळवार ७ मे २०२४ चां प्रचार दौरा ” न भूतो न भविष्यती ” असा असल्याने विजयाची नांदी व गुलालाची साथ आपल्याच अंगावर असल्याची साक्ष असे चित्र उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारात दिसून आले.

कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात व कर्जत शहरात सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हा प्रचार दौरा पळसदरी – भिसेगाव – चार फाटा – श्रीरामपूल – दहिवली – खांडपे – कोंदिवडे – चोचीची वाडी – बीड – मोहिली – धाकटे वेणगाव – जांभिवली – कडाव – कशेळे – पाथरज – खांडस – नांदगाव – बलीवरे – ओलमन – कळंब – पोशीर – नेरळ साई मंदिर नाका – नेरळ शहर – डिकसळ – किरवली – ते बाळासाहेब भवन जनसंपर्क कार्यालय शिवसेना कर्जत त्यानंतर कर्जत शहर महायुती रॅली असा प्रचार दौरा धुमधडाक्यात पार पडला.

या महारॅलीत महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे , कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे , भाजप विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे , मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र दादा पाटील त्याचप्रमाणे महायुतीतील घटक पक्ष शिवसेना , भाजप , राष्ट्रवादी , मनसे , आर पी आय , या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी , महिला आघाडी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page