Monday, April 15, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत तालुक्यातील ग्रामासाथी (कातकरी) यांचा माध्यमातून जाहीर निवेदन नायब तहसीलदारला दिले..

कर्जत तालुक्यातील ग्रामासाथी (कातकरी) यांचा माध्यमातून जाहीर निवेदन नायब तहसीलदारला दिले..

दि.16.कर्जततालुक्यातील कातकरी कुटुंबाना जातीचे दाखले मिळणेसाठी शिबिरांचे आयोजन करण्यात यावे,अशी मागणी तालुका ग्रामसाथी यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

यावेळी मुंबई अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरण संस्था,मुंबई यांच्या द्वारे पूर्ण केलेल्या आदिम कातकरी जमातीच्या सर्वेक्षणातून प्राप्त माहिती व आकडेवारीत बहुतांश कातकरी कुटुंबाकडे जातीचे दाखले,रेशनकार्ड,आधार कार्ड,इत्यादी शासकीय दाखले नसल्याचे निष्पन्न झालेले आहे.

त्या अनुषंगाने कर्जत तालुक्यातील सर्व कातकरी बांधवाना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी शासकीय दाखले वाटप शिबिरांचे आयोजन करणे अत्यंत आवश्यक आहे.

तसेच कर्जत नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांना तालुका ग्राम साथी कातकरी लेखीपत्राद्वारे निवेदन देणायत आले आहे.
त्याप्रमाणे कर्जत उपविभागीय अधिकारी यांना ही निवेदन देण्यात आले.

यावेळी उपस्थित कर्जत तालुका ग्रामसाथी किसन वाघमारे,सविता पवार, विशाखा आहेर आदी सह उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page