Saturday, July 13, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत तालुक्यातील " विजयभूमी युनिव्हर्सिटी " विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षणाची संग्रामभूमी !

कर्जत तालुक्यातील ” विजयभूमी युनिव्हर्सिटी ” विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षणाची संग्रामभूमी !

स्वर्गीय विजय सिंग पडोदे यांनी स्वप्न केले साकार..

भिसेगाव- कर्जत (सुभाष सोनावणे) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आधुनिक आणि तंत्रज्ञान युगात विविध प्रकारचे शिक्षणाचे धडे किती महत्वाचे आहेत , ते आत्मसात केल्यास अनेक गुणांनी नटलेले विद्यार्थी अवकाशात गरुड भरारी घेण्यास सिद्ध होऊ शकतात , हे प्रत्येक्षात उतरविण्याचे तसेच देशाला व समाजाला पुढे नेण्याचे महान कार्य कर्जत तालुक्यातील जामरूंग येथे निसर्गाच्या सानिध्यात जागतिक मान्यताप्राप्त असलेली विजयसिंगजी पडोदे यांनी अतिशय परिश्रमाने ” विजयभूमी युनिव्हर्सिटी ” उभारून त्यांचे स्वप्न साकार केले.
जागतिक दर्जाचे युनिव्हर्सिटीत जाऊन प्रत्येक गोष्टीची बारकाईने निरीक्षण करून खूप मेहनत व परिश्रम घेऊन शिक्षण साम्राज्य निर्माण केले आहे . विजयभूमी ही विद्यार्थ्यांसाठी संग्रामभूमी असावी हि प्रेरणा ” विजयभूमी युनिव्हर्सिटी ” चे सर्वेसर्वा स्वर्गीय विजयसिंगजी पडोदे यांनी येथे साकारल्याचे चित्र पहाण्यास मिळत आहे.विजयभूमी युनिव्हर्सिटी ही , भारतातील पहिली लिबरल प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आहे . तिची स्थापना डिसेंबर २०१८ मध्ये झाली . विद्यार्थ्यांना शिक्षण हे इच्छेनुसार मिळणे गरजेचे असल्याने जगातील प्रमुख शहरातील तसेच भारत , युरोप , अमेरिका , फ्रान्स , ऑस्ट्रेलिया , न्यूयॉर्क , केज , टेकसास , येथे जाऊन रिसर्च केले , व विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार , क्षमतेनुसार शिक्षण घेणे कसे गरजेचे आहे ही बाब विद्यार्थ्यांना पटवून दिले.
आर्टिफिशियल इंटेलिजियन्स , डेटा सायन्स , सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग , सायन्स आणि टेक्नॉलॉजी , बिझनेस , लॉ , डिझाईन , व्यापारी , म्युझिक टेक्नॉलॉजी आणि लिबरल आर्ट्स , या विषयामध्ये उच्च दर्जाचे संशोधन देण्यासाठी निसर्गाच्या कुशीत वसलेली ही ” विजयभूमी युनिव्हर्सिटी ” प्रयत्नशील आहे.त्यातच मैदानी खेळाला आम्ही प्राधान्य देत एकाच वेळी अनेक विषयांत विद्यार्थी पारंगत होत आहेत , ग्रामिण भागात अभ्यास करून शहरी भागात ते जातात . ही पद्धत इतिहास कालीन आश्रम शाळेवर आधारित असून हुश्यार , तरुणांना तयार करण्याची ही संग्रामभूमीच म्हणावी लागेल. जगातील युनिव्हर्सिटी या ७०० तर काही ३०० वर्षांपूर्वीच्या आहेत ,मात्र विजयभूमी युनिव्हर्सिटी ही ३ वर्षांत निसर्गाच्या सानिध्यात तयार करून प्रसन्न मन ठेवून शिक्षण शिकवले जाते , संपूर्ण देशातून येथे विद्यार्थी शिक्षण घेण्यास येत आहेत.
भारतीय शिक्षण हे जगात डंका पिटला पाहिजे , असे धोरण असल्याने स्थानिक परिसरातील विद्यार्थ्यांनी येथे प्रवेश घेणे गरजेचे असून गुणवत्ता असेल , तर नक्कीच येथे प्रवेश घ्या , असे आवाहन देखील येथे करण्यात येत आहे . म्युझिक क्षेत्रात संगीत कसे तयार करायचे , हे शिकवले गेल्याने विद्यार्थी कुठेही जॉब ला लागू शकतात , संगीताचा संगम होणं , हे शिकवले जाते , विद्यार्थी येथे शिक्षण घेत असताना , जगातील सर्वात प्रसिद्ध संगीत विद्यालयात शिक्षणास मास्टर डिग्री घेण्यास जात असतात.आज दि. २८ सप्टेंबर २०२२ रोजी २२ विद्यार्थ्यांना पदवी संपादन कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी विजयभूमी युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष श्री.संजय पडोदे हे या पदवीदान समारंभाचे अध्यक्ष होते .याप्रसंगी ” विजयभूमी युनिव्हर्सिटी ” ची महंती सांगण्यास या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन २०२० पद्मभूषण पुरस्कार प्राप्त प्रा.जगदीश शेठ , आय आय टी कानपूरचे माजी संचालक सन २०१३ पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ.संजय धोंडे , विजयभूमी चे प्र- कुलगुरू प्रा.ए.परशुरामन , इंडियन बिझनेस एज्युकेशन जागतिकीकरणाचे पुरस्कर्ते प्र- कुलगुरू डॉ.आतिष चट्टोपाध्याय , डॉ.सोनवणे , प्रणिता पांडुरंगी – म्युझिक टीचर आदी प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते .अजूनही ३०० विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page