सावेळे प्रभागातील बहुसंख्य तरूणांनी केला भाजपा मध्ये प्रवेश..
भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
कर्जत तालुक्यातील सावेळे जिल्हा परिषद वार्डातील बहुसंख्य तरुणांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी , माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्याने प्रभावित होऊन रायगड जिल्हाध्यक्ष तथा पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कामावर विश्वास ठेवून व कर्जत – खालापूर मतदार संघाचे स्थानिक नेतृत्व सुनील गोगटे यांच्या पुढाकाराने राहुल मसणे आणि मिनेश मसणे यांच्या मार्गदर्शनाने कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांच्या हस्ते आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
त्यामुळे आगामी येणाऱ्या निवडणुकीत सावेळे जिल्हा परिषद प्रभागात भाजपाची ताकद वाढलेली दिसून येत आहे.कर्जत तालुक्यात भारतीय जनता पक्षाने काही थोड्याच महिन्यात सामाजिक उपक्रम , आंदोलने , मोर्चे , निवेदन देऊन नागरिकांच्या महत्वपूर्ण प्रश्नांत हात घालून सोडविण्याचा प्रयत्न केला आहे , तर कोरोना काळात गरीब गरजू नागरिकांना अन्न – धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात अग्रेसर राहिले आहेत.
शासन दरबारी देखील शेतकरी बांधवांचे प्रश्न , पूरग्रस्त नागरिकांना तातडीची मदत बाबतीत केलेले आंदोलन , रस्त्यांचे प्रश्न , पेण बँकेतील पैसे मिळण्यासाठी चाललेली धडपड , कर्जत मधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी बायपास रस्त्यासाठी चाललेली भविष्यातील दूरदृष्टी , व तालुक्याच्या विकासासाठी केंद्रातून आणलेला निधी , या आणि अनेक प्रकरणात उडी घेऊन भारतीय जनता पक्षाने तालुक्यात कोकण संपर्क प्रमुख सुनील गोगटे आणि सर्व जिल्हा व तालुका कार्यकारिणी अतिशय सुबुद्धी व विचारपूर्वक करत असलेले नियोजन यावर अनेकांचे लक्ष केंद्रीत झाले असून भविष्यात कर्जत – खालापूर मतदार संघाचा आमदार हा भाजपाचाच व्हावा , असे मनसुबे आखत अनेक तरुण कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात दाखल होत आहेत.
आज किसान मोर्चा कोकण संघटक सुनील गोगटे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या प्रवेश कार्यक्रमात सावेळे जिल्हा परिषद प्रभागातील मिनेश मसणे , समाधान मसणे , प्रसाद मसणे , भालचंद्र मसणे , सागर मसणे , प्रशांत मसणे , साहिल मसणे , हरेश काटकर , ऋत्विक मसणे , रोशन मसणे , किशोर मसणे , योगेश मसणे , कुलदीप मसणे , संतोष ठमके , दामू मसणे , प्रसाद मसणे , प्रकाश मसणे , निवृत्ती मसणे , कुमार मसणे , तेजस मसणे , यतीश मसणे , देवा मसणे , नरेश मसणे , महेश मसणे , रुपेश मसणे , सुनील मसणे , सुरेश मसणे , अनंत मुने , यांनी पक्षप्रवेश करून भाजपाचा झेंडा हाती घेतला.
यावेळी जिल्हा चिटणीस रमेश मुंढे , कोकण संघटक सुनील गोगटे , तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर , तालुका सरचिटणीस संजय कराळे , शहराध्यक्ष तथा नगरसेवक बळवंत घुमरे , शहर सरचिटणीस प्रकाश पालकर , तालुका महिला आघाडी अध्यक्ष स्नेहा गोगटे , सोशल मीडिया कोकण संपर्क महिला मोर्चा संयोजक ऍड .गायत्री परांजपे,तालुका सोशल मीडिया संयोजक मिलिंद खंडागळे, सावेळे जिल्हा परिषद वॉर्ड अध्यक्ष अंकुश मुने , युवामोर्चा शहर मयुर शितोळे , अल्पसंख्याक शहर अध्यक्ष बिलाल आढाळ , तालुका प्रज्ञा प्रकोष्ठ समीर सोहोनी , युवा शहर चिटणीस सर्वेश गोगटे , विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिषेक तिवारी , आणि बहुसंख्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.या पक्ष प्रवेशामुळे कर्जत तालुक्यात भाजपाची गरुड भरारी व वाढत चाललेली ताकद दिसून येत आहे.