Wednesday, October 23, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत तालुक्यात पिंगळस आश्रम शाळेत " स्टुडंट पोलीस कॅडेट " कार्यक्रम संपन्न...

कर्जत तालुक्यात पिंगळस आश्रम शाळेत ” स्टुडंट पोलीस कॅडेट ” कार्यक्रम संपन्न !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) आजच्या या देशाच्या भावी पिढीस शालेय दशकात कायद्याचे ज्ञान प्राप्त व्हावे , व त्याचे अनुकरण भविष्यात त्यांच्या माध्यमातून घडावे , हा उद्दात् हेतू डोळ्यासमोर ठेवून जिल्हा वाहतूक शाखा अलिबाग , पेण विभागाच्या माध्यमातून मंगळवार दि. १२ मार्च २०२४ रोजी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पिंगळस , ता.कर्जत या ठिकाणी ” स्टुडंट पोलीस कॅडेट ” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . सदर कार्यक्रमांमध्ये इयत्ता आठवी, नववी मधील २४० विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान संबोधित करण्यात आले.

सदर कार्यक्रमांमध्ये जिल्हा वाहतूक शाखेचे पेण विभागाच्या माध्यमातून वाहतूक पोलीस उपनिरिक्षक कमलाकर सी. मुंढे यांनी विद्यार्थ्यांना कायदा व सुव्यवस्था , गुन्हे शोध व तपास , जनताभिमुख पोलीसिंग , रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमन , समाजातील वाईट गोष्टींविरुद्ध लढा , महिला व बाल अत्याचार , सायबर गुन्हे , आपत्ती व्यवस्थापन , भ्रष्टाचार विरुद्ध लढा , मूल्य व नितीशास्त्र , संयम , सहनशीलता – संवेदनशीलता , आदर , संघभावना , शिस्त व पोलीसांचे दैनंदिन कामकाज यासंबंधी उचित मार्गदर्शन केले .यावेळी विद्यार्थ्यांनी सदरचे मार्गदर्शन मन लावून ऐकले व यावर चर्चा देखील केली.

सदर कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक संजय मागाडे , जिल्हा वाहतूक शाखा , अलिबाग पेण विभागाचे ASI सताने , PSI के. सी. मुंढे , यांची उपस्थिती होती . यावेळी शाळेचे शिक्षक वर्ग व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page