कर्जत तालुक्यात पोलीस मित्र संघटनाच्या वतीने तालुका अध्यक्ष पदी उत्तम बाळू ठोंबरे निवड..

0
42

कर्जत :प्रतिनिधी:गुरुनाथ नेमाणे

दि.११.कर्जत तालुक्यातील महत्त्वाच्या पदांच्या नियुक्तीचा कार्यक्रम डिकसळ शांतीनगर डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता.सर्वप्रथम जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्या नंतर दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित जिल्हा पदाधिकारी रायगड जिल्हा अध्यक्ष किशोर शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत तालुका अध्यक्ष उत्तम बाळू ठोंबरे यांची नियुक्ती करण्यात आली,कर्जत तालुका युवा अध्यक्ष मिलिंद डुकरे,तर तालुका कायदेशीर सल्लागार उत्तम गायकवाड,तसेच कर्जत माथेरान व खालापूर तालुक्याच्या पदांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

उपस्थित जिल्हा पदाधिकारी रायगड जिल्हा अध्यक्ष किशोर शितोळे,जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे,जिल्हा उपाध्यक्ष दशरथ मुने,जिल्हा महासचिव रमेश कदम,जिल्हा सचिव सुप्रिया साळोखे,जिल्हा संघटक किशोर गायकवाड,जिल्हा सल्लागार दीपक बोटूंगळे,तालुका कायदेशीर सल्लागार उत्तम गायकवाड, कर्जत तालुका युवा उपाध्यक्ष हेमंत कदम,तालुका सेल उपाध्यक्ष शांताराम मिरकुटे, गणेश केवरी,तालुका सेल संघटक कैलास पवार, कर्जत तालुका युवा उपाध्यक्ष एकनाथ भिलारे,मनोज घारे,हेमंत कदम,सुभाष ठाणगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.