Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत तालुक्यात विकास कामांच्या भूमीपूजनांचा धुमधडाका !

कर्जत तालुक्यात विकास कामांच्या भूमीपूजनांचा धुमधडाका !

भरघोस निधी आणून आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या शुभहस्ते संपन्न..

भिसेगाव – कर्जत (सुभाष सोनावणे) कर्जत – खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे साहेब यांच्या प्रेरणेने आपल्या मतदार संघात १५ कोटी ६३ लाख रुपयांचा निधी आणला असून या विकास कामांच्या निमित्ताने भूमीपूजनांचा धुमधडाका पुन्हा एकदा सुरू केला असून ग्रामीण भागात दळणवळण सुरळीत व्हावे , हा दुरदृष्टिकोण समोर ठेवून भूमिपूजन समारंभ त्यांच्या शुभहस्ते पार पडले.
मा.आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकास कामांचा शुभारंभ भूमिपूजन सोहळा आज गुरुवार दि. ८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी चांदई – दहिवली – खांडपे – कांदिवडे या रस्त्याचे भागाभागात मजबुतीकरण व सुधारणा करणे , लोभ्याचीवाडी – सुगवे – पिंपळोली – नेरळ रस्ता रुंदीकरण मजबुतीकरण व डांबरीकरण करणे , लोभ्याची वाडी – सुगवे – पिंपळोली – नेरळ उर्वरित रस्ता रुंदीकरण मजबुतीकरण व डांबरीकरण करणे , नेरळ – कशेळे – भीमाशंकर घाट रस्ता या रस्त्याची लांबीची सुधारणा करणे , दहिवली – देवपाडा – वारे – कुरुंग रस्त्याची मजबुतीकरण व सुधारणा करणे , रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पोशीर – माले – फोंड्याचीवाडी – नारळाचीवाडी – पादिरवाडी – ओलमन – चई – चेवणे – नांदगाव – खांडस मार्ग रस्त्याची सुधारणा करणे , कर्जत तालुक्यातील पोशीर – माले – फोंड्याचीवाडी – नारळाचीवाडी – पादीरवाडी – चई – चेवणे – नांदगाव – खांडस उर्वरित मार्ग रस्त्याची सुधारणा करणे , कशेळे – खांडस – गणपती घाट रस्त्याची मजबुतीकरण व डांबरीकरण करणे , रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोठीबे – जांबरूग – सोलनपाडा रस्त्याची भागाभागात मजबुतीकरण डांबरीकरण करणे , आदी रस्त्याचे भूमिपूजन आज आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या शुभ हस्ते पार पडले .
यावेळी राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते . एकूण १५ कोटी ६३ लाख रुपयांची ही कामे असून या कामांमुळे ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलणार आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page