Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" कर्जत दहिवली प्रभागात शिवसेना ठाकरे गटाला खिंडार "..

” कर्जत दहिवली प्रभागात शिवसेना ठाकरे गटाला खिंडार “..

अखेर आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या ” विकास कार्याचा ” करिश्मा !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) शिवसेना पक्षाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या ” विकास कार्याचा वारू ” चौफेर उधळत असताना कर्जत शहरातील दहिवली प्रभागातील ठाकरे शिवसेनेचे अनेक कट्टर शिवसैनिक आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश करणार असून यामुळे शिवसेना ठाकरे गटाला हा जोरदार धक्का असणार आहे . प्रवेश करणारे हे शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी असल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा पक्ष प्रवेश होणार असल्याने आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे या निमित्ताने ” हात ” मजबूत होणार आहेत.

” हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे ” यांच्या आशीर्वादाने आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब आणि कार्यसम्राट आमदार मा.महेंद्रशेठ थोरवे यांच्या नेतृत्वाखाली उद्या रविवार , दिनांक १५ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता कर्जत खालापूरचे लोकप्रिय आमदार मा.महेंद्रशेठ थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना ( उ बा ठा ) पक्षाचे कर्जत शहर संपर्क प्रमुख संजय मोहिते , शहर समन्वयक सुदेश देवघरे , व कर्जत उपशहर प्रमुख प्रसाद डेरवणकर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली दहिवली परिसरातील शेकडो शिवसैनिक शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश करणार आहेत.

या पक्ष प्रवेशाने कर्जत शहरात खूप मोठा हादरा शिवसेना ठाकरे गटाला बसणार आहे . यातील शहर संपर्क प्रमुख असलेले संजय मोहिते हे सामना चे पत्रकार असून त्यांचा कर्जत शहर , दहिवली व गुंडगे प्रभागात दांडगा जनसंपर्क आहे . त्यामुळे आगामी काळात या तिन्ही प्रभागात शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व वाढणार असून याचा फायदा आगामी निवडणुकीत पहायला मिळणार आहे.
संजय मोहिते हे कर्जत नगर परिषद निवडणुकीत गुंडगे प्रभागातील शिवसेनेचे संभाव्य उमेदवार असल्याचे ऐकण्यात येत आहे , तर प्रसाद डेरवणकर हे आकुर्ले प्रभागातील लोकप्रिय नेतृत्व असून त्यांच्या पत्नी मा. नगरसेविका प्राची डेरवणकर या निवडून आल्या होत्या . तसेच शहर समन्वयक सुदेश देवघरे हे देखील तरुणांत चांगले नेतृत्व असून त्यांचा देखील या परिसरात दांडगा जनसंपर्क आहे . त्यांच्या या पक्ष प्रवेशामुळे कर्जत नगर परिषद हद्दीत खूप मोठा धक्का शिवसेना ठाकरे गटाला व इतर पक्षाला होवून गळतीला सुरुवात होणार , हे मात्र नक्की , असेच काहीसे चित्र आगामी काळात पहाण्यास मिळणार , यांत शंकाच नसेल.
- Advertisment -

You cannot copy content of this page