Sunday, April 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत नगर परिषदेच्या आवारातील झाड वीज वाहिनीवर पडल्याने अनेक बगळे गतप्राण..

कर्जत नगर परिषदेच्या आवारातील झाड वीज वाहिनीवर पडल्याने अनेक बगळे गतप्राण..

प्रभाकर गंगावणे व प्राणी मित्र शाहरुख मुल्ला यांच्या मदतीने जखमी बगळ्यांना जीवनदान..

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
कर्जत नगर परिषदेच्या इमारतीच्या आवारात कोपऱ्यावर खूप जुने झाड आहे.त्यावर वर्षेनुवर्षे बगळ्यांचे वास्तव्य आहे.आज ते झाड त्याच्या शेजारीच असलेल्या वीज कंपनीच्या वाहिनीवर कोसळल्याने लागलेल्या शॉकच्या धक्क्याने जवळपास चाळीस ते पन्नास बगळे विजेचा तीव्र धक्का लागून गतप्राण झाले.

पालिकेच्या इमारतीच्या आवारात आतील कोप-यावरील जुने झाड असून त्यावर सफेद बगळे मोठ्या प्रमाणात फांद्यांवर बसून असतात.हे झाड जुने झाल्याने आज ते कोसळले.या झाडाच्या शेजारूनच वीज कंपनीचा ट्रान्सफॉर्मर आहे . त्यामुळे हे झाड जीवंत वीज वाहिनीवर पडल्याने वीज वाहिनी तुटली व झाडावर बसलेल्या बगळ्यांना त्याचा जबरी शॉक लागला.

त्यामुळे अनेक बगळे रस्त्यावरच गतप्राण झाले . सदरचा प्रकार रत्नराज हॉस्पिटलच्या समोरच घडला आहे.हा रस्ता नेहमीच वर्दळीचा असल्याने काही बगळ्यांच्या अंगावरूनही वाहने गेल्याने त्यांचा जागीच चेंदामेंदा झाला.तर झाडावरील अनेक पक्षी देखील मृत झाले. याच दरम्यान सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर गंगावणे यांनी हा अपघात झाल्याचे बघताच लागलीच त्यांनी रस्त्यावर मृत पडलेले पक्षी उचलुन एका ठिकाणी ठेवले.

तर अनेक बगळे जखमी अवस्थेत पडले होते.योगायोगाने त्याच वेळी तिथे गुंडगे येथे रहाणारे शाहरुख मुल्ला हे प्राणी मित्र तेथे आले व त्यांनी जे जिवंत जखमी पक्षी होते त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना एका पिंजऱ्यात नेले व मृत पक्षांना एका गोणीत भरुन जमिनीत पुरण्यासाठी नेले.त्यामुळे परिसरात हळहळ पसरली असून त्या प्राणी मित्र शाहरुख मुल्ला व सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर गंगावणे यांचे तेथील रहिवासी यांनी जखमी बगळ्यांना जीवनदान दिलेबाबत त्यांचे मनापासुन आभार व्यक्त केले.तर मृत झालेल्या बगळ्यांना पक्षी मित्र शाहरुख मुल्ला यांनी गोणीत टाकून जमिनीत पुरण्यास घेऊन गेले .

- Advertisment -

You cannot copy content of this page