Wednesday, May 29, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत नगर परिषदेच्या " तकलादू " कामामुळे नाक्यावरील गटाराचे झाकण जैसे थे...

कर्जत नगर परिषदेच्या ” तकलादू ” कामामुळे नाक्यावरील गटाराचे झाकण जैसे थे !

अपघात झाल्यावरच जाग येणार का ? व्यापारी व नागरिकांचा संतप्त सवाल..

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत नगर परिषद हद्दीत रेल्वे स्थानकाच्या बाहेर पूर्व दिशेला बाजारपेठेला सुरुवात होते . या बाजारपेठेत रेल्वे प्रवासी , ग्राहकांची , वाहनांची , त्याचप्रमाणे चालत पाल्यांना शाळेत सोडणा-या महिलावर्ग , यांची नेहमीच वर्दळ असते . या मुख्य बाजारपेठेतच प्रथम दर्शनी भागात शिंदे हॉटेल व संतोष वाईन्स समोर असणाऱ्या मुख्य रस्त्यावरील गटाराचे झाकण डिसेंबर महिन्यात खराब झाले होते , मात्र पालिकेने केलेले काम तकलादू झाल्याने आता पुन्हा त्याठिकाणी खड्डा झाला असून त्यावरून हजारो टन वजनांचा माल वाहतुकीचा ट्रक , प्रवासी घेऊन जाणारी रिक्षा , या गटाराच्या खड्डयात कलांडून अपघात होऊन जीवितहानी झाल्यावरच पालिका प्रशासनास व संबंधित अधिकारी वर्गास जाग येणार का ? असा संतप्त सवाल येथील व्यापारी , नागरिक व छत्रपती शिवाजी राजे तक्रार निवारण संघटनेने केली आहे.

सार्वजनिक रस्ते हे कर्जत न.प.तसेच कर्जत प्रांत , तहसील कार्यालय , पोलीस ठाणे यांच्या देखील अधिकारात येतात . प्रांत अधिकारी व कर्जत तहसीलदार कधीच या रस्त्यांवरून त्यांच्या गाडीने जाताना दिसत नसल्याने ” हे अवघड जागी झालेले दुखणे ” त्यांना कधीच दिसणार नाही , मात्र कर्जत पोलीस ठाणे व पालिकेचे अधिकारी व लोकप्रतिनिधी या रस्त्यावरून नेहमी जात असल्याने अपघात होणाऱ्या अश्या प्रथमदर्शनी खड्ड्याकडे करत असलेल्या दुर्लक्षामुळे परिसरात संताप खदखदत आहे.सदरील गटारावरील झाकण खराब झाले आहे , या झाकणाच्या जाळ्या फाकल्या असल्याने या निर्माण झालेल्या पोकळीत दोनचाकी , हातगाडीचे चाक , अवजड चार चाकी वाहने , तीन चाकी रिक्षा कलांडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसून नागरिकांचे व लहान मुले , विद्यार्थी यांचे पाय अडकून पडल्याचे घटना घडल्यास जीवावर बेतू शकते.

तरी त्वरित कर्जत नगर परिषदेच्या प्रशासनाने व लोकप्रतिनिधी यांनी या अपघात ग्रस्त झाकणाचा बंदोबस्त करून झाकण चांगल्या प्रतीचे बनवून बदली करण्याची मागणी येथील व्यापारी , नागरिक व रेल्वे प्रवासी तसेच छत्रपती शिवाजी राजे तक्रार निवारण संघटनेने केली आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page