Thursday, September 12, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ.सुवर्णा केतन जोशी यांना लोकमत प्रिंट मीडियाने केले...

कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ.सुवर्णा केतन जोशी यांना लोकमत प्रिंट मीडियाने केले सन्मानित..

हा सन्मान भविष्यात गरुड भरारी घेण्यास प्रेरणादायी..

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ.सुवर्णा केतन जोशी यांचा नामांकित लोकमत प्रिंट मीडिया समूहाने त्यांच्या नगराध्यक्षांच्या कारकिर्दीत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना ” लोकमत वुमन अचिवमेंट ” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यांचा झालेला सन्मान म्हणजे भविष्यात त्यांना गरुड भरारी घेण्यास प्रेरणादायी ठरणार आहे.कर्जत नगरीत नगराध्यक्षा म्हणून थेट नागरिकांमधून निवडून गेलेल्या नगराध्यक्षा सौ.सुवर्णा केतन जोशी यांच्या निवडीला दोन वर्षांचा कालावधी होऊन गेला आहे.

या दोन वर्षात आपल्या कार्याची चमक त्यांनी विविध विकास कांमातून दाखवून दिलेली आहे.कोरोना काळात न डगमगता नागरिकांची सुरक्षा जपत सुरक्षिततेची साधने व शासना कडून आलेले आदेश पाळत पालिका हद्दीत कोरोनावर मात करण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रत्येक प्रभागात आरोग्य , वीज , स्वच्छ पाणी ,शौचालये , स्वच्छता अभियान ,वृक्षारोपण , सुसज्ज रस्ते ,कचरा निर्मूलन , नाले सफाई , फवारणी आदी कामे करुन कर्जतकरांसाठी उल्लेखनीय कार्य केले आहे.सामाजिक ,राजकीय , क्रिडा , सांस्कृतिक, इतर क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान लोकमत प्रिंट मिडिया समूहाने केला ,खरोखरच कौतुकाची थाप महिलांसाठी प्रेरणादायी व नवीन ऊर्जा देणारी ठरेल.

आपले घरदार, संसार सांभाळून अनेक महिला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असतात त्यांच्या कार्याचा असा सत्कार म्हणजे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी वेगळेच  प्रोत्साहन असून हा पुरस्कार म्हणजे सर्व कर्जत करांचा माझ्यावर असलेला विश्वास आणि त्यांचे आशीर्वाद असल्याचे मत नगराध्यक्षा सौ.सुवर्णा जोशी यांनी व्यक्त करत भविष्यात कर्जतकरांसाठी जास्तीत जास्त चांगले आणि अभिमानास्पद कार्य करण्याच्या इच्छा शक्तिसाठी असेच प्रेम आणि सहकार्य राहू द्या ,असे भावनिक उदगार काढले.आज महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती सन्माननीय सौ. निलमताई गो-हे,राज्यमंत्री आणि रायगडच्या पालकमंत्री आदितीताई तटकरे,मराठी अभिनेत्री आदिती सारंगधर यांच्या हस्ते आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना ” लोकमत वुमन अचिवमेंट ” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी कर्जत नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ.रजनीताई रामदास गायकवाड व माथेरानच्या नगराध्यक्षा सौ.प्रेरणा सावंत यांना हि सन्मानित करण्यात आले.

- Advertisment -

You cannot copy content of this page