भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत नगर परिषदेने खरेदी केलेला ” सफेद हत्ती ” म्हणजेच उगीचच लाखो रुपयांचा फर्जी खर्च करून बिनकामाची ठरलेली ” व्याक्यूम मशीन गाडी ” चे दर्शन कर्जतकरांना दि. २ जानेवारी २०२३ ला रात्री ८ – ३० वाजता झाले . हि व्याक्यूम मशीन गाडी रस्त्यावरील धूळ साफ करण्यासाठी खरेदी केली असून यासाठी ६० लाख रुपये खर्च केले आहेत.मात्र नागरिकांच्या पैशातून खरेदी केलेल्या या गाडीला उगीचच खर्च केल्याने नागरिकांत संताप खदखदत आहे.अश्या खरेदीवर नागरिकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी देखील चकार शब्द काढत नसल्याने यासाठीच का या लोकप्रतिनिधींना निवडून दिले ? अशी संतापजनक चर्चा या गाडीचे दर्शन झाल्यावर चौकाचौकात होत आहे.
या व्याक्यूम गाडीवर जो दर्जेदार गाडी चालक पाहिजे , तो अद्यापी नसल्याने या दिवशी गाडी चालक म्हणुन कर्जत नगर परिषदेच्या कचरा गाडीवरचा गाडी चालक याने हि गाडी चालविली , त्यामुळे प्रशिक्षण नसलेल्या गाडी चालकाला हि व्याक्यूम मशीन गाडी कशी हाताळायची हे समजत नसल्याने धूळ जैसे थे रहात होती.तर कचरा देखील जागेवरचा हलत नसल्याने त्यामुळे नुसताच या गाडीचे ” चमकेश ” दृश्य पालिका दाखविण्याचा काय हेतू होता , हे समजले नसल्याने नागरिक संतप्त उलटसुलट चर्चा करताना दिसत होते.
त्यातच पालिकेला फक्त बाजारपेठच दिसते का , इतर प्रभागातील रस्ते दिसत नाहीत का ? प्रत्येक प्रभागातील नागरिकांना देखील या व्याक्यूम मशीन गाडी किती धूळ साफ करते , हे दिसू द्या , अशी संतप्त चर्चा देखील नागरिक करत होते . त्यामुळे कर्जत नगर परिषदेने खरेदी केलेला लाखो रुपयांचा ” सफेद हत्ती रुपी व्याक्यूम मशीन गाडी ” खरेदी करण्यासाठी नक्की काय हेतू होता , यासाठी कुठल्या लोकप्रतिनिधी यांनी होकार दिला , याची चौकशी होण्याची संतप्त मागणी नागरिकांमधून होत आहे .