![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत बाजारपेठेसहित कर्जत नगर परिषदेचे कार्यालय असलेल्या परिसरात बँकांना अधिकृत पार्किंग नसल्याने बँकांत कामानिमित्त आलेले ग्राहक आपली दोन चाकी व चार चाकी वाहने रस्त्यावरच बेकायदेशीर पार्किंग करत असल्याने परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होत असून याकडे मात्र कायद्याचे रक्षक असलेले कर्जत पोलीस ठाण्याचे वाहतूक शाखेचे सपशेल दुर्लक्ष होत असून वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली कायद्याचे रक्षकच करत असल्याने पाच आकडी पगार घेऊन कर्तव्यात कसूर करताना दिसत आहेत , यामुळे कर्जत शहरात अस्ताव्यस्त वाहनांची जत्राच भरल्याच चित्र येथे दिसत आहे.यामुळे नागरिकांत वाहतूक शाखेबद्दल संताप खदखदत आहे.
कर्जत पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर कर्जत नगर परिषदेचे कार्यालय आहे , याच इमारतीत शेजारी स्टेट बँक ऑफ इंडिया हि भाडेतत्त्वावर बँक आहे , तर बाजूलाच शाळेच्या आवारात बँक ऑफ महाराष्ट्र बँक आहे ,त्याच्या पुढे काळे बिल्डिंग मधील ठाणे भारत सहकारी बँक लि. बँक आहे , त्याचप्रमाणे कपालेश्वर मंदिराच्या वर आर डी सी बँक आहे , महाड बँक , एक्सीस बँक , बडोदा बँक ,आय डी बी आय बँक , बँक ऑफ इंडिया , तर प्रसाद झेरॉक्स समोर असलेली युनियन बँक , पालिका कार्यालया समोरील डोंबिवली नागरी सहकारी बँक , या सर्व बँका या परिसरात असताना यां बँकांना येणाऱ्या ग्राहकांसाठी कुठेच पार्किंगची व्यवस्था नसल्याने ग्राहक आपली दोन चाकी व चार चाकी वाहने रस्त्यावरच पार्किंग करत असल्याने ऐन रहदारीच्या बाजारपेठ परिसरात पार्किंगची कोंडी होत आहे.
यामुळे नागरिकांना त्याचा नाहक त्रास होत आहे.कर्जत महिला मंडळ शाळेच्या बाहेर असलेला व वाहतुकीला अडथळा ठरणारा वीज कंपनीचा ट्रान्सफॉर्मर कर्जत न.प. ने लाखो रुपये खर्च करून हटवला आहे . तर या जागेवर आता चार चाकी वाहने बेकायदेशीर पार्किंग केली जात असल्याने , यासाठीच का येथील ट्रान्सफॉर्मर हटवला ? अशी संतप्त चर्चा नागरिकांत होत आहे . तर नदी विसर्जन घाट परिसरात वर्षानुवर्षे काही वाहने धूळ खात पडली आहेत , हि वाहने कुणा मालकीची आहेत , की कुठली बेकायदेशीर काम करून येथे लावली आहेत.
याची खातरजमा देखील कर्जत पोलीस ठाणे घेताना दिसत नाहीत , येथील रस्ता अश्या वाहनांच्या पार्किंगसाठी आंदण दिला आहे का ? अशी संतप्त चर्चा आता होऊ लागली आहे.या सर्व ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीकडे कर्जत पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेचे सपशेल दुर्लक्ष होत आहे , यावर कुठलीच कारवाई होत नाही , म्हणूनच येथील बेकायदेशीर होणारी पार्किंग हटवून रस्ता सुरळीत करावा , अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.