कर्जत पंचायत समितीच्या वतीने”कर्जत कोविड योद्धा” नारायण सोनवणे जाहीर सत्कार….

0
71

(कर्जत प्रतिनिधी:गुरुनाथ नेमाणे)

दि.12 कर्जत पंचायत समिती कर्जतच्या मासिक सभेत “कर्जत कोविड योद्धा “म्हणून रायगड जिल्हा परिषद केंद्र वैजनाथचे केंद्रप्रमुख नारायण भिकू सोनवणे यांचा तालुक्याचे पंचायत सभापती सुजाता मनवे यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थित सत्कार करण्यात आला.रायगड भूषण नारायण सोनवणे यांनी कोरोना  मधील या महामारीच्या काळात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेले आहे.                        

संपूर्ण जगासोबत भारत कोवीड विरोधात लढत असताना सोनवणे  यांनी कर्जततालुक्यातील ,गरीब,गरजू, दिव्यांग बांधवांच्या कुटूंबासाठी (1721पेक्षा जास्त)अन्नधान्य,जी वस्तू, व कोविड19 पासून सुरक्षा देणारे साधने मोफत घरपोच  केले आणि करीत आहेत.शिक्षण क्षेत्रातील तांत्रिक अडचणींना सामोरे जात प्रसंगी केंद्रातील गावातून विद्यार्थ्यांसाठी “शिक्षण विद्यार्थ्यांच्या दारी”ही शिक्षणप्रक्रिया अखंडित ठेवली.

आपल्या देशातील आणि राज्यातील समाजातील कूठूबासाठी,विद्यार्थ्यांसाठी  जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षा,आरोग्य व शिक्षणासाठी ते अहोरात्र करीत असलेल्या कार्यकर्तृत्वाचा पंचायत समितीने “कर्जत तालुका कोविड योद्धा” म्हणून सन्मानपत्र देऊन  गौरव करणयात आला आहे.             

यावेळी कोविड 19 च्या कालखंडात शासकीय जबाबदारी सांभाळत विविध शैक्षणिक उपक्रमे व प्रयोगातून विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानगंगा पोहचविण्याचे अविरत कार्य करीत आहेत.सभेत रायगडभूषण अरुण जोशीं समाज सेवेबद्दल  सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कर्जत पंचायत समिती सभापती सुजाता मनवे,उपसभापती भीमाबाई पवार व सर्व पंचायतसमिती सदस्य आणि सदस्य कर्जत पंचायत गटविकास अधिकारी बालाजी पुरी,सहायक गटविकास अधिकारी रजपूत सर गटशिक्षण अधिकारी दौंड सर विस्तार अधिकारी अहिरे सर व शिक्षणविस्तार अधिकारी हिरवे मॅडम,आदी मान्यवर उपस्थित होते.सर्वांनी पुढील वाढचाली शुभेच्छा देणायत आल्या आहेत.