Monday, July 15, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत पंचायत समिती सभापती पदी शिवसेनेच्या सौ. सुषमा भानुदास ठाकरे यांची बिनविरोध...

कर्जत पंचायत समिती सभापती पदी शिवसेनेच्या सौ. सुषमा भानुदास ठाकरे यांची बिनविरोध निवड..

भिसेगाव-कर्जत/सुभाष सोनावणे.

कर्जत पंचायत समिती सभापती पदी शिवसेनेच्या सौ.सुषमा भानुदास ठाकरे यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


कर्जत पंचायत समितीत शिवसेनेची निर्विवाद सत्ता आहे .येथील १२ जागांपैकी सात जागेवर शिवसेनेचे सदस्य निवडून आले आहेत .त्यापैकी वेणगाव – सौ.सुषमा भानुदास ठाकरे , उमरोली – प्रदीप ठाकरे , दहिवली तर्फे वरेडी – अमर मिसाळ , नेरळ – सौ.सुजाता मनवे , पोशीर – राहुल विशे , सावेळे – भीमाबाई पवार , पिंपळोली – काशीनाथ मिरकुटे हे निवडून आले आहेत.

प्रत्येक वर्षी एक सभापती करण्याचे आश्वासन येथील शिवसेनेचे सर्वेसर्वा , कर्जत – खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्रशेट थोरवे यांनी दिल्याप्रमाणे यावेळी सौ.सुषमा भानुदास ठाकरे यांची वर्णी सभापती पदी करून आश्वासनाची पूर्तता केली.


सौ.सुषमा भानुदास ठाकरे या शिवसेनेच्या धुरंधर रणरागिणी , जिल्हा महिला शिवसेना संघटक रेखाताई ठाकरे यांच्या स्नुषा आहेत .यावेळी सौ.सुषमा भानुदास ठाकरे यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी आमदार महेंद्रशेट थोरवे , रायगड उपजिल्हा प्रमुख भाई गायकर , रायगड जिल्हा शिवसेना महिला संघटक रेखाताई ठाकरे , माजी सभापती मनोहर थोरवे ,माजी सभापती व सदस्य अमर मिसाळ , माजी सभापती व सदस्य प्रदीप ठाकरे , मावळत्या सभापती सुजाता मनवे , विभागप्रमुख सुनील ठाकूर ,वेणगाव ग्रामपंचायत उपसरपंच गणेश पालकर ,पंचायत समितीचे विद्यमान सदस्य , पंचायत समिती अधिकारी , कर्मचारी , त्याचप्रमाणे तालुक्यातील शिवसैनिक , पदाधिकारी , महिला पदाधिकारी , युवासेना मोठ्या संख्येने उपस्थित होते .

- Advertisment -

You cannot copy content of this page