Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत बुद्ध नगर येथील अनेक कामांचे लोकार्पण सोहळा नगराध्यक्षा सौ.सुवर्णा जोशी यांच्या...

कर्जत बुद्ध नगर येथील अनेक कामांचे लोकार्पण सोहळा नगराध्यक्षा सौ.सुवर्णा जोशी यांच्या हस्ते संपन्न !

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे) कर्जत नगर परिषद हद्दीतील कर्जत बुध्दनगर येथील दलित वस्ती योजने अंतर्गत अनेक कामाचे लोकार्पण सोहळा आज दि.१५ ऑक्टोबर २०२१ रोजी दसरा तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून नगराध्यक्षा सौ.सुवर्णा केतन जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या शुभहस्ते पार पडले.हे काम समाज मंदिरामध्ये पहिल्या मजल्यावर सिलिंग व समाज मंदिरामध्ये रंगकाम करणे तसेच मुख्य प्रवेशद्वार लोखंडी दरवाजा बसवणे ,दलित वस्ती योजनेअंतर्गत हे काम १८ लाख तसेच शिवम अपार्टमेंट ते नाना निकम यांचे गटावरील स्लॅब टाकणे – ५ लाख ९६ हजार रुपये तर कर्जत बुद्धनगर जवळील कोपरा गार्डनचे बांधकाम करणे – स्वच्छ भारत अभियान प्रोत्साहनपर निधी अंतर्गत ६ लाख ५१ हजार रुपये आदी कामांचे उदघाटन व लोकार्पण सोहळा नगराध्यक्षा सौ.सुवर्णा केतन जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पार पडले.

यावेळी नंतर आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी देखील या कार्यक्रमास भेट दिली.यावेळी झालेल्या कार्यक्रमात कर्जत बुद्धनगर येथील राहुल युवक मंडळ , व यशोधरा महिला मंडळ यांच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा सौ. सुवर्णा जोशी , उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल , पाणी पुरवठा सभापती राहुल डाळिंबकर , नगरसेवक बळवंत घुमरे , महिला व बालकल्याण सभापती संचिता पाटील ,उपसभापती प्राची डेरवणकर , मागासवर्गीय कल्याण सभापती वैशाली मोरे , नगरसेवक विवेक दांडेकर , उमेश गायकवाड ,मधुरा चंदन ,भारती पालकर , सुवर्णा निलधे , पुष्पा दगडे , हेमंत ठाणगे , प्रथम उपनगराध्यक्ष व एसआरपी जिल्हाध्यक्ष उत्तमभाई जाधव ,आरपीआय जिल्हा संपर्क प्रमुख धर्मानंद गायकवाड , कोकण प्रदेश नेते मारुती गायकवाड , सामाजिक कार्यकर्ते शरद मोरे , एसआरपी ता.अध्यक्ष प्रभाकर गोतारणे ,वंचित बहुजन आघाडी ता.अध्यक्ष धर्मेंद्र मोरे ,दिपक बेहरे , रमेश मुंडे , मंदार मेहंदळे , नगर रचना अभियंता मनीष गायकवाड , कनिष्ठ अभियंता सारिका कुंभार ,आदी मान्यवर विचार पिठावर उपस्थित होते.

तर गणेशदादा जोशी , अशोक शिंदे , दीपक भालेराव ,
जगन काकडे , एसआरपी चे गौतम ढोले ,माजी नगरसेवक दिपक मोरे , अरविंद मोरे , शिवसेना कर्जत विभागप्रमुख नदीम खान , नाना निकम , आदी नागरिक उपस्थित होते.यावेळी नगराध्यक्षा सौ. सुवर्णा जोशी यांनी दसरा व धम्मचक प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करून समाज मंदिराचे काम खूप सुंदर केले आहे , भविष्यात पुढेही सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले. जांभा दगडात ज्ञानबोधी वटवृक्ष साकारणार असल्याचे सांगितले.

तर पाणीपुरवठा सभापती राहुल डाळिंबकर यांनी मी २००४ – २००९ – २०१९ या सालात तीन वेळा नगरसेवक झालो ,यावेळी मोठ्या प्रमाणात कामांचा धडाका केला तर यावेळी या कामांत नगराध्यक्षा ,उपनगराध्यक्ष सहित सर्व नगरसेवक यांचे श्रेय असल्याचे सांगितले.तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राहुल युवक मंडळाचे अध्यक्ष सुमित गायकवाड ,अलोक डाळिंबकर , अमोघ डाळिंबकर ,युगांत रणदिवे , सुदर्शन निकम ,अनिकेत रणदिवे , अविनाश रणदिवे आदींनी सहकार्य केले , तर सूत्र संचालन भालेराव सर , व डाळिंबकर मॅडम यांनी केले.यावेळी मोठ्या प्रमाणात महिलावर्ग व नागरिक उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page