Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" कर्जत मध्ये साकारणार भव्य दिव्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन "..

” कर्जत मध्ये साकारणार भव्य दिव्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन “..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत नगर परिषद हद्दीत मुद्रे येथे ” भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन ” साकारण्यात येणार असून त्याची प्रतिकृती तयार झाली असून यासाठी कर्जत – खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी विशेष प्रयत्न करून तब्बल ५ करोड रुपयांचा निधी मंजूर केला असून हि प्रतिकृती व होणाऱ्या कामाची माहिती देण्यासाठी कर्जत तालुक्यातील सर्व पक्षातील आंबेडकरी अनुयायी , व बौद्ध बांधव यांना आमंत्रित करून आज ” बाळासाहेब भवन ” येथे एक बैठक आयोजित करण्यात आली होती . त्यामुळे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी दिलेला शब्द पाळला असून हे भव्य दिव्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन लवकरच साकारणार असल्याचे दिसून येत आहे.

नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान म्हणून शासनाच्या ” वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत ” कर्जत नगरपरिषद हद्दीत ” भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बांधणे ” या कामाकरिता रु.५,००,००,०००/- ( पाच कोटी ) इतका निधी मंजूर करण्यात आला आहे . या प्रकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत येथील ” बाळासाहेब भवन ” जनसंपर्क कार्यालय येथे बैठक संपन्न झाली. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या प्रस्तवित डिजाईन ची PPT सादर करण्यात आली . हि ऐतिहासिक वास्तू भव्य स्वरुपात असून त्यांत तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उभे स्मारक , लायब्ररी व संग्रहालय असणार आहे .

त्यामुळे या भव्य – दिव्य वास्तूची कर्जत नगरीत सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रात सुवर्ण अक्षरात नोंद होईल , अशीच हि प्रतिकृती उभारण्यात येणार आहे .
- Advertisment -

You cannot copy content of this page