Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत येथील लहान मोठया व्यावसायिकांना मानवसेवा बहुउद्देशीय संस्थेचा मदतीचा हात....

कर्जत येथील लहान मोठया व्यावसायिकांना मानवसेवा बहुउद्देशीय संस्थेचा मदतीचा हात….

(कर्जत प्रतिनधी:गुरुनाथ नेमाणे)
कर्जत दि १: कर्जत तालुक्यामध्ये मानवसेवा बहुउद्देशीय संस्थेचा मदतीचा हात अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्याअंतर्ग आज ऑफिस नंबर.७नेमीनाथ शॉपिंग सेंटर मुद्रे (बु) कर्जत येथे सुरुवात करण्यात आली आहे.गेली ७ महिने कोरोनाच्या महामारी मध्ये गेले असताना या ६ ते ७ महिने हाताला काम नाही,धंदे नाही,काहीच व्यवसाय नाहीअशा परिस्थितीत काय करू काय राहू अशा चिंता नागरिकांना सतावू लागल्याने.कोरोनाच्या काळात आर्थिक मंदीचा फटका उद्योग धंद्यावर बसला आहे.
याकरिता मानवसेवा बहुउद्देशीय संस्थेच्या प्रयत्नातून गरजू लाभार्थीना आपले उद्योग धंदे सुरु करण्याकरिता सामाजिक संस्थेच्या मार्गदर्शनाने काही छोटे मोठे लोन म्हणजे भाजीपाला,फूड,हातगाडी आणि धंद्याची उपजीविका करिता सरकारी नियमानुसार बँक मार्फत योजना राबवत संस्थेने एक हात मदतीचा यामार्फत गरजू नागरिकांना आधार देणे गरजेचे असल्यामुळे आणि महिला वर्गाला ही त्यांच्या स्वतःच्या पायावर उभेराहून छोटे मोठे उदयोगासाठी मदत देण्याच्या हेतूने बँकेच्या लोन सुविधा पुरविण्यात येणार आहे.यावेळी उपस्थित मानवसेवा बहुउद्देशीय संस्था संचालक दीपक जगताप,मानवसेवा बहुउद्देशीय संस्था महिला अध्यक्ष सविता जगताप,उषा जाधव,रवींद्र धारगावे, इत्यादी त्यांचे सर्व सहकारी टीम वर्ग आणि सर व मॅडम आणि नागरिक उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page