Monday, July 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घडामोडीत बदल !

कर्जत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घडामोडीत बदल !

जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोपतराव , कर्जत तालुका अध्यक्ष भगवानशेट चंचे,तर कर्जत शहर कार्याध्यक्ष पदी राजेशदादा लाड व शहराध्यक्ष रणजित जैन यांची नियुक्ती…

भिसेगाव-कर्जत (सुभाष सोनावणे)
कर्जत तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लक्षात घेता रायगडचे राजकीय द्रोणाचार्य , कोकणचे भाग्यविधाते , खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांच्या आदेशाने व रायगड जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण नेतृत्वाला न्याय देऊन नुकतेच कर्जत खालापूर मतदारसंघात बदल करण्यात आलेले आहेत.

तरुणांना मुख्य राजकीय प्रवाहात आणण्याचे पक्षाध्यक्ष मा.शरदचंद्र पवार साहेबांचे आदेश असल्याने झालेले फेरबदल तालुक्यात नक्कीच करिष्मा दाखविणार यांत तिळमात्र देखील शंका नसल्याचे राजकीय तज्ञ मत व्यक्त करताना दिसत आहेत.नुकतेच खासदार सुनील तटकरे खालापूर येथे आलेले असताना जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ लाड यांच्या बरोबर झालेल्या चर्चेनुसार कर्जत तालुक्यातील राजकीय मातब्बर नेतृत्व राजिप चे माजी सभापती अशोकशेठ भोपतराव यांना कर्जत तालुका अध्यक्ष पदावरून बढती मिळून जिल्हा उपाध्यक्ष पदी त्यांची निवड करण्यात आली आहे.तर तालुक्यातील डॅशिंग नेतृत्व व नेरळ ग्रामपंचायतीचे माजी

सरपंच तसेच यापूर्वी तालुका उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलेले मा . भगवानशेठ चंचे यांची कर्जत तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.कर्जत शहरातील तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेले व माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ लाड यांचे राजकीय वारसदार म्हणून प्रख्यात असलेले त्याचप्रमाणे संघटन कौशल्याची जाण असणारे , कर्जत नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष मा.राजेश दादा लाड यांची कर्जत शहर कार्याध्यक्ष पदी निवड करून त्यांना संघटनात्मक कार्य करण्यास संधी दिली आहे.

तर व्यापारी क्षेत्रात नावाजलेले मा .रणजितशेठ जैन यांची कर्जत शहर अध्यक्ष पदी नियुक्ती करून शहरातील घडामोडीत झालेले फेरबदल नक्कीच प्रेरणादायी असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भविष्यात यशस्वी घौडदौड पहाण्यास मिळणार आहे.
सहा महिन्यांनंतर येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोपतराव व कर्जत तालुका अध्यक्ष भगवानशेट चंचे यांची कसोटी पणाला लागणार आहे.

मात्र तालुक्याचा राजकीय अभ्यास व गेली ५० वर्षे राजकारणात असणारे कर्जत – खालापूर मतदारसंघाचे तीन वेळा नेतृत्व करणारे माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच यशस्वी होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा कर्जत पंचायत समितीवर डौलाने फडकणार , हेच आजच्या तरुण नेतृत्वाना दिलेल्या संधीवरून दिसून येत आहे . नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे खालापूर येथे मा. खासदार सुनील तटकरे , जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुरेशभाऊ लाड त्याचप्रमाणे अनेक मान्यवर , पदाधिकारी यांनी अभिनंदनाचा वर्षाव करून पुढील यशस्वी कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page