Wednesday, September 18, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत रेल्वे तीन आसनी रिक्षा चालक-मालक संघटनेची श्री सत्यनारायणाची महापुजा प्रजासत्ताक दिनी संपन्न ! 

कर्जत रेल्वे तीन आसनी रिक्षा चालक-मालक संघटनेची श्री सत्यनारायणाची महापुजा प्रजासत्ताक दिनी संपन्न ! 

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) सालाबाद प्रमाणे ह्या वर्षीहि २६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिनी ” कर्जत  रेल्वे  तीन  आसनी रिक्षा चालक – मालक संघटना – स्टँड नंबर – १ ” च्या वतीने ” श्री सत्यनारायणाची महापुजा ” आयोजीत केली होती.  कर्जत  रेल्वे फलाट क्रमांक १ च्या बाहेर  तीन  आसनी  रिक्षा  स्टॅण्ड आहे .
सदर संघटनेचे हे ४१ वे वर्ष होते . कर्जत न.प.चे प्रथम उपनगराध्यक्ष मा.उत्तमभाई जाधव हे या संघटनेचे अध्यक्ष आहेत . यावेळी अनेक राजकीय , धार्मिक , शैक्षणिक , व्यापारी व अनेक संघटनेच्या मान्यवरांनी पुजेला उपस्थिती दर्शविली. यांत कर्जत नगर परिषदेचे नगराध्यक्षा सौ.सुवर्णा जोशी , नगरसेवक राहुल डाळींबकर , पंचायत समिती माजी उपसभापती मनोहर दादा थोरवे , माजी नगराध्यक्ष राजेश दादा लाड , कर्जत वार्ता संपादक प्रशांत खराडे , माजी नगरसेवक धनंजय दुर्गे , मनसे कर्जत शहर प्रमुख राजेश साळुंखे , रेल्वे हॉस्पिटल चे श्री व सौ. डॉ. चव्हाण , केतन गायकवाड , रेल्वे पोलीस कर्मचारी , रेल्वे आरपीएफ , रेल्वे स्टेशन मास्टर शर्मा साहेब , त्याचप्रमाणे अनेक कर्जतकर यांनी दर्शन घेऊन तीर्थप्रसादाचा लाभ घेतला , यावेळी त्यांचा गुलाब पुष्प व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी जय हनुमान प्रासादिक भजनी मंडळ – एकसळ यांचे संगीत भजन , गायक किशोर बुवा बोराडे , मृदुंग मनी – आकाश बुवा काटे , तबला भूषण म्हसे , यांचे भजन ऐकण्यास मोठ्या प्रमाणात भजनी श्रोते मंत्रमुग्ध होत उपस्थित होते . यावेळी मां. नगराध्यक्ष राजेश दादा लाड व मां. उपसभापती मनोहर दादा थोरवे यांनी देखील भजन गाऊन मनमुराद आनंद घेतला , त्यांच्या सोबतीस सुनील बुवा देशमुख हे देखील उपस्थित होते , तर दर्शन पवार ,नमिता सुरेंद्र थोरवे , पूजा विचारे – पोसरी यांनी सुन्दर रांगोळी काढली होती . यावेळी पूजेला बसण्याचा मान श्री व सौ. चेतन देशमुख यांना लाभला.

यावेळी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष – उत्तमभाई जाधव , सल्लागार – बी .के .राऊत , उपाध्यक्ष – नरेश थोरवे , स्टँड प्रमुख – विनोद मोरे , उपस्टॅण्ड प्रमुख – विजय ताम्हाणे , सचिव – सचिन महाडिक , उपसचिव – महेश लाड , रमण देवघरे , खजिनदार – अरुण बैलमारे , अरुण घरत , अनंता ताम्हाणे , सल्लागार – पत्रकार सुभाष सोनावणे , केतनभाई शहा , महेश भोसले , जनार्धन डफळे , अरुण ढोमसे ( फम भाय ) सभासद – दिपक दांडेकर , उत्तम गंगावणे , अरुण मोरे , संजय जाधव , रामदास थोरवे , जितेंद्र ढाकवळ , विठ्ठल शिवेकर , मंगल देशमुख , विजय थोरवे , रोहिदास पवार , भालचंद्र भोईर , मंगेश देशमुख , आदी पदाधिकारी व अनेक रिक्षा चालक – मालक या महापुजेस उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page