Wednesday, May 29, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत रेल्वे स्थानकातील सुलभ शौचालयाची सेवा रात्री बंद असल्याने रेल्वे प्रवाश्यांची गैरसोय...

कर्जत रेल्वे स्थानकातील सुलभ शौचालयाची सेवा रात्री बंद असल्याने रेल्वे प्रवाश्यांची गैरसोय !

शौचालय २४ तास खुले करण्याची एसआरपी पक्षाची मागणी…

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक २ वर असलेले सुलभ शौचालय रात्रीच्या वेळी बंद असल्याने रेल्वे प्रवाश्यांची व महिला वर्गाची नैसर्गिक विधी करण्यास गैरसोय होत असल्याने नागरिकांनी विधी करण्यास कुठे जावे , असा सवाल रेल्वे प्रवासी करत असून नागरिकांत रेल्वे प्रशासनाच्या या नैसर्गिक विधी रोकण्याच्या दंडेलशाही विरोधात संताप खदखदत आहे.याविरोधात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम भाई जाधव व सामाजिक कार्यकर्ते सचिन चव्हाण यांनी रेल्वेचे सुलभ शौचालय रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी २४ तास उघडे ठेवण्याची मागणी केली आहे.कर्जत रेल्वे स्थानक हे मुंबई – पुणे रेल्वे महामार्गाचे मध्यवर्ती ठिकाण आहे.
बहुसंख्य आदिवासी बहुल भाग व त्यातच कामगार वर्ग , चाकरमनी , मुंबईकडे कामाला जाणारे शासकीय कर्मचारी , खोपोली येथे कंपनीत जाणारे कारागीर , कल्याण वरून भाजी आणणारे होलसेल – किरकोळ भाजी विक्रेते , मुंबईला मच्छी आणणारे होलसेल विक्रेते , मुंबई येथे दवाखान्यात जाणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक , रात्रीचे प्रवासाला निघणारे रेल्वे प्रवासी , धार्मिक दर्शनाला जाणारे भाविक , कर्जत हे पर्यटन स्थळ असल्याने येणारे पर्यटक , रात्रीचे पॅसेंजर गाडी तसेच लोकल रेल्वे प्रवासाला आल्यावर त्यांना नैसर्गिक विधी करण्यास कुठे जावे , असा प्रश्न पडतो , त्यामुळे त्यांची खूपच गैरसोय होते.अश्या वेळी रेल्वे परिसरात नैसर्गिक विधी करण्याशिवाय पर्याय नसल्यास रेल्वे परिसरात घाणीचे व दुर्गंधी पसरली जाते.
यासर्व बाबीस रेल्वे प्रशासनच जबाबदार आहे. सदरचे सुलभ शौचालय हे ठेकेदारास चालविण्यास दिले असून तेथे पुरुष व महिला असे वेगवेगळे शौचालय आहे . येथे चालक म्हणून नाजीम हा व्यक्ती असतो , मात्र हे शौचालय रात्री १० वाजताच कुलूपबंद केले जाते , व सकाळी ६ वाजता उघडले जाते , असे असल्याने महिलावर्ग व नागरिक रेल्वे प्रवाश्यांची खूपच गैरसोय होत आहे ,यामुळे नागरिकांत व रेल्वे प्रवाश्यांत रेल्वे प्रशासानाविरोधात संताप खदखदत आहे . याविरोधात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम भाई जाधव व सामाजिक कार्यकर्ते सचिन चव्हाण यांनी सदरचे शौचालय रेल्वे प्रवाश्यांची गैरसोय टाळण्यासाठी २४ तास खुले करावे , अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे .
- Advertisment -

You cannot copy content of this page