Saturday, December 7, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत वीज कंपनीला त्यांच दुकान नीट चालवता येत नसेल तर बंद करा.....

कर्जत वीज कंपनीला त्यांच दुकान नीट चालवता येत नसेल तर बंद करा.. नागरीकांचा होणारा त्रास थांबवा..


वंचितचे अध्यक्ष धर्मेंद्रभाऊ मोरे यांचा तीव्र आंदोलनाचा ईशारा.


कर्जत (शुभाष सोनावणे) पूर्वीचे वीज महामंडळ बंद करून वीज कंपनीची स्थापना झाल्याने नागरिकांना वीज पुरविणारे वीज कंपनीचे कार्यालय म्हणजे एक दुकान असून वीज कंपनीच्या मालकाला नागरिकांना नीट सेवा देत येत नसेल तर हे दुकान बंद करावे,व नागरिकांना होणारा त्रास थांबवावा , अन्यथा अशा गलथान कारभारा विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा सक्त ईशारा आज कर्जत तालुका वंचित बहुजन आघाडीचे डॅशिंग तालुका अध्यक्ष धर्मेंद्रभाऊ मोरे यांनी निवेदनाद्वारे कर्जत वीज कंपनीचे मालक तथा उपकार्यकारी अभियंता प्रकाश देवके यांना दिला.


हवामान खात्याच्या अंदाजानुसार व मा. जिल्हाधिकारी तथा आपत्ती नियोजन व्यवस्थापन अधिकारी यांनी रायगडात ताऊक्ते चक्रीवादळ येणेबाबतचा अंदाज अगोदरचं सांगितला होता. त्यानुसार वीज कंपनीला सुसज्ज तयारीत राहण्यास सांगितले होते. परंतु वीज कंपनीचे मालक असलेले सुस्त अधिकारी नेहमीप्रमाणे सुस्तावलेले राहुन कुठल्याही प्रकारची दक्षता घेतली नाही. त्यामुळे तालुक्यात विजेचे अनेक गंजलेले पोल पडून कर्जत तालुका दोन दिवस पुर्ण अंधारात राहीला. एकीकडे कोरोनाचे वाढते रुग्ण, उष्णता, विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परिक्षा, घरुन काम करणारे (WORK FROM HOME) कर्मचारी , विजे अभावी पाणी नसणे आदी सर्वांवर याचा खुप परिणाम होऊन नागरीकांना याचा मानसिक त्रास सहन करावा लागला.


त्यातच यापूर्वीच्या लाॅकडाऊन मध्ये महावितरणने विजबिले माफ केली नाहीत. ज्यांनी बिलं भरली नाहीत त्यांचे कनेक्शन मार्च एन्डला कट करण्यात आले.शिवाय ऐन लाॅकडाऊन मध्ये महावितरणने विजबिल वाढ केली.त्यातच सालोसाल वीज कंपनी नागरिकांना तक्रारी करूनही त्या पद्धतीने सर्व्हीस देत नाही. हा एक प्रकारे नागरिकांवर अन्याय आहे. तालुक्यातील नागरिकांनी वारंवार तक्रारी करुन सुद्धा पडायला आलेले पोल, तसेच अडचणीतले कनेक्शन , जुनाट झालेल्या वायर , लोड घेत नसलेले ट्रान्सफॉर्मर यासंदर्भात महावितरणचे अधिकारी व कर्मचारी वेळीचं लक्ष देत नाहीत. त्यामुळेच ही गंभीर परिस्थिती आता निर्माण झाली आहे,असा आरोप धर्मेंद्रभाऊ मोरे यांनी केला.


कोरोना काळात अनेक कोरोना बाधित रुग्ण हॉस्पीटलमध्ये तसेच घरी उपचार घेत आहेत, अनेकांना मेडीकल उपकरणांची गरज लागते , तसेच विद्यार्थ्यांचा अभ्यास व परिक्षा ऑनलाईन सुरु आहेत.अनेक कर्मचारी घरुनचं काम करतात,त्यांना इंटरनेट व काम करणेसाठी विजेची गरज असते तसेच व्यवसायिक दृष्ट्या सुद्धा विज नसल्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे.विजे अभावी पाणी नसल्याने महिलांना त्रास सोसावा लागला आहे.

याबाबत वंचितचे अध्यक्ष धर्मेंद्रभाऊ मोरे यांनी या सुविधा बंद झाल्याने संताप व्यक्त केला.आत्ता हा मे महिना चालू आहे,पुढे काही दिवसात पाऊस सुरू होईल तसेच अशा प्रकारचे वादळे येत राहतील तरी आपण तशी परिस्थिती येणेची वाट पाहण्यापेक्षा आतापासूनच कर्जत शहरात व तालुक्यात सर्व्हे करून सर्व गंजलेले पोल, नादुरुस्त पोल, जुनाट झालेल्या वायर , तारा , लोड घेत नसलेले ट्रान्सफॉर्मर तसेच इतर कनेक्शन अशी सर्व कामे त्वरीत पुर्ण करावीत व पुन्हा जर नागरीकांना अंधारात रहावं लागले.

कुठल्या रुग्णाचा जीव गेला, तसेच विद्यार्थी, कामगार, शेतकरी, व्यापारी यांच्या नुकसानास वीज कंपनी सर्वस्वी जबाबदार राहील , असे ठणकावत जर तुम्हाला तुमचं दुकान चालवता येत नसेल तर बंद करा , पण नागरिकांचा नाहक होणारा त्रास बंद करा,अन्यथा या सुस्त कारभाराविरोधात कर्जत तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा वीज कंपनीचे मालक तथा उपकार्यकारी अभियंता श्री.प्रकाश देवके यांना निवेदन मधून देण्यात आले.सदर निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे डॅशिंग कर्जत तालुका अध्यक्ष धर्मेंद्रभाऊ मोरे,शहर अध्यक्ष लोकेश यादव, विद्यार्थी संघटनेचे अमित गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page